Homeताज्या बातम्यासंपादकीय

विरोधाची एकजूट : पर्याय आणि अडचणी !

काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवलेल्या कर्नाटक मधील मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी ज्या मान्यवरांना देशभरातून बोलवले जात जात आहे, त्यामध्ये दिल्ल

सल आणि सूड ! 
मीरा बोरवणकरांच्या पुस्तक निमित्ताने! 
फडणवीसांची आक्रमकता अन् विरोधकांची हतबलता!

काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवलेल्या कर्नाटक मधील मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी ज्या मान्यवरांना देशभरातून बोलवले जात जात आहे, त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर अर्थात चंद्रशेखर राव या दोन मुख्यमंत्र्यांना यादीतून वगळल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र आमच्या मते ही नाव बदलल्यात काँग्रेसने काही चूक केली आहे असे अजिबात वाटत नाही. याची दोन कारणे प्रमुख्याने आहेत, पहिले म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला संघाचा छोटा रिचार्ज म्हटले जाते. तर, चंद्रशेखर राव यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा टी आर एस हा पक्ष बी आर एस असे नाव घेऊन, राष्ट्रीय पातळीवर  आपला पक्ष वाढवण्याचे मनसुबे जाहीर केले. त्याची पहिली सभा त्यांनी नांदेड येथे घेतली होती आणि या सभेला  मोठ्या प्रमाणात समुदाय उपस्थित होता. त्याचबरोबर आता देशभरात राष्ट्रीय आघाडी करण्यासाठी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या दोन ओबीसी नेत्यांनी म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपा विरोधात विरोधी पक्षांची एकजूट होण्यास सर्वात मोठी अडचण निश्चितपणे केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि चंद्रशेखर राव यांचा बी आर एस पक्ष हे अडथळे ठरणार आहेत, अशी चर्चा राजकीय तज्ञांमध्ये अंतर्गत वर्तुळात मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात राष्ट्रीय राजकारण एक मोठे आव्हान घेऊन उभे असताना काँग्रेस सारख्या एका अनुभवी आणि मजबूत अशा पक्षाने, काही पक्षांना आधीच टाळण्याची भूमिका घेणे म्हणजे हे भविष्यवेत्ता असल्यासारखेही दिसते आणि त्यामुळे ते चुकीचेही ठरते. कर्नाटक निवडणुका जिंकल्यानंतर देशभरात एक संदेश मात्र निश्चितपणे पोहोचला आहे की आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट आकाराला येणार आहे. मात्र 1977 स*** आणीबाणी नंतर देशात काँग्रेस विरोधी जसं सर्वपक्षीय एकजूट उभी राहिली होती तशी एकजूट तुम्ही होण्यात 2024 मध्ये निश्चितपणे अडचणी आहेत. याचे कारण 1977 ची परिस्थिती आणि 2024 ची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचे अंतर निर्माण झाले आहे. 1977 साली देशभरामध्ये समाजवादी, कम्युनिस्ट  आणि त्यासोबतच आंबेडकरवादी चळवळी या सामाजिक आंदोलनात अत्यंत प्रखर होत्या आणि त्यामुळे त्यांचा राजकीय दबाव गट देखील तेवढाच प्रभावी होता. त्यावेळचा जनसंघ पक्ष हा काँग्रेस विरोधातल्या एकजूटीत समाविष्ट करू नये, अशा सूचना समाजवादी, कम्युनिस्ट पक्षांच्या होत्या. मात्र, त्यावेळी विरोधाच्या एकजुटीचे नेतृत्व करणारे जयप्रकाश नारायण यांनीच मार्ग काढून जनसंघाला काँग्रेस विरोधातल्या एकजूटीत प्रवेश दिला होता. त्या प्रवेशातून मिळवलेली संधी जनसंघाने भारतीय जनता पक्षातून आता राष्ट्रव्यापी बनवली आहे, ही आजची सर्वात मोठी आव्हानात्मक बाब आहे. आज त्याच जनसंघाचे भारतीय जनता पक्ष म्हणून  राष्ट्रीय राजकारणात आव्हानात्मक उभे राहिले आहे. त्या विरोधातच काँग्रेस एक विरोधकांची एकजूट उभी करू पाहत आहे. मात्र, त्या एकजुटीत भारतीय जनता पक्षाशी किंबहुना त्यांच्या मातृ संघटनेशी म्हणजे संघाशी संबंधित असलेल्या काही राजकीय पक्षांना टाळण्याची भूमिका काँग्रेस आतापासून घेत आहे. ही भूमिका कितपत योग्य आहे, हे काळ ठरवेल. पण, त्याचबरोबर अनेकांचा काँग्रेसकडे पाहण्याचा आक्षेप देखील असा आहे की, काँग्रेस आणि भाजप या नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा देखील आक्षेप अनेक वेळा चर्चेत येतो. अर्थात असा आक्षेप जरी घेऊन घेतला जात असला तरी त्याला केवळ विरोध करून काँग्रेसला तोटा येणार नाही तर त्यांच्या पक्षातील रुलिंग कास्ट असलेल्या सर्वच राज्यातील जातीसमूहांना त्यांना त्या संदर्भात सूचित करावे लागेल की, समाजातील तळाच्या जातींनाही त्या ठिकाणी राजकीय प्रतिनिधित्व मिळावे. त्याशिवाय ही एकजूट निर्माण होऊ शकत नाही. कारण, सामाजिक आधार असल्याशिवाय राजकीय एकजूटीचे काहीही वास्तव असे महत्त्व राहत नाही.

COMMENTS