Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फार्माफ्युजन’ वर्किंग मॉडेल स्पर्धा उत्साहात 

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी.फार्मसी, बोधेगाव येथे दि. १४ फेब्रुवारी रोजी ५ वी राष्ट्रीय स्तरावरील ‘फार्माफ्युजन’ फार्मा वर्किंग मॉडेल स्पर्धा उत्साहात पार पडली. देशातील विविध राज्यांतील फार्मसी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संशोधनाधिष्ठित व नवोन्मेषी मॉडेल्स सादर केली.  स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मणराव बीटाळ,उच्चशैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. हेमंत गांगुर्डे,कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मच्छिंद्र फसले, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश मोकाटे इ.मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासावी असे आवाहन केले.  स्पर्धेत एकूण ३५ वर्किंग मॉडेल्स सादर करण्यात आले. सदर वर्किंग मॉडेल्सचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षकांनी नवकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिक उपयोगिता आणि सामाजिक आरोग्यविषयक उपयुक्तता या निकषांवर केले. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा. सुजित पाटील, प्रा. पवन जगताप व प्रा.ऋषिकेश देशमुख यांनी काम पाहिले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांमधे प्रथम पारितोषिक गलहट विशाखा व बानगर साक्षी द्वितीय पारितोषिक अंकुश राजू पाटील तृतीय पारितोषिक मिर्झा सानिया व आव्हाड मोहिणी तर उत्तेजनार्थ पारितोषिक ऋतुजा तांदळे यांना प्रदान करण्यात आली.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा.सोमनाथ डावखर, प्रा.भरत जाधव व प्रा.अमोल सुपेकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संदीप खंडागळे व चेतना संचेती यांनी केले तर आभार प्रा.सोमनाथ डावखर यांनी मानले. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विद्याधर काकडे, माजी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मणराव बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे तसेच कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्री  पाटील  विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे व सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले.

सामान्य नागरिकांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले – डॉ.योगेश क्षीरसागर
आ. गोरेंना तत्काळ अटक करा; अन्यथा 25 ला आंदोलन; जनता क्रांती दलाचा इशारा
जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी.फार्मसी, बोधेगाव येथे दि. १४ फेब्रुवारी रोजी ५ वी राष्ट्रीय स्तरावरील ‘फार्माफ्युजन’ फार्मा वर्किंग मॉडेल स्पर्धा उत्साहात पार पडली. देशातील विविध राज्यांतील फार्मसी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संशोधनाधिष्ठित व नवोन्मेषी मॉडेल्स सादर केली.

 स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मणराव बीटाळ,उच्चशैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. हेमंत गांगुर्डे,कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मच्छिंद्र फसले, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश मोकाटे इ.मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासावी असे आवाहन केले.

 स्पर्धेत एकूण ३५ वर्किंग मॉडेल्स सादर करण्यात आले. सदर वर्किंग मॉडेल्सचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षकांनी नवकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिक उपयोगिता आणि सामाजिक आरोग्यविषयक उपयुक्तता या निकषांवर केले. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा. सुजित पाटील, प्रा. पवन जगताप व प्रा.ऋषिकेश देशमुख यांनी काम पाहिले.

उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांमधे प्रथम पारितोषिक गलहट विशाखा व बानगर साक्षी द्वितीय पारितोषिक अंकुश राजू पाटील तृतीय पारितोषिक मिर्झा सानिया व आव्हाड मोहिणी तर उत्तेजनार्थ पारितोषिक ऋतुजा तांदळे यांना प्रदान करण्यात आली.

 कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा.सोमनाथ डावखर, प्रा.भरत जाधव व प्रा.अमोल सुपेकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संदीप खंडागळे व चेतना संचेती यांनी केले तर आभार प्रा.सोमनाथ डावखर यांनी मानले. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विद्याधर काकडे, माजी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मणराव बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे तसेच कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्री  पाटील  विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे व सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले.

COMMENTS