Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्काराचा इशारा

राहाता नगरपरिषद हद्दीतील नागरिकांचा इशारा

राहाता ः राहाता नगरपरिषदेत हद्दीतील नागरिकांना नगरपरिषदेकडून कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने 13 मे रोजी होणार्‍या शिर्डी लोकसभा

देवळाली प्रवरा गावात चोरट्यांनी फोडली आठ घरे
रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजक तयार होतील : बापुसाहेब पुजारी

राहाता ः राहाता नगरपरिषदेत हद्दीतील नागरिकांना नगरपरिषदेकडून कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने 13 मे रोजी होणार्‍या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन जिल्हा निवडणूक अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे दिले आहे.
     नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहाता नगरपरिषद हद्दीतील चाणखणबाबा ते एकरूखे शिव रस्त्याची अनेक वर्षापासून अत्यंत वाईट दुरावस्था झाली आहे. या परिसरात राहाता शहरातील जवळपास 30 टक्के नागरिकांचे वास्तव्य आहे. नागरिक दैनंदिन  कामासाठी या रस्त्याचा वापर करतात. रस्त्या बरोबरच रस्त्याच्या कडेला पथदिवे व पिण्याची पाणी व्यवस्था करण्यात आली नाही. या परिसरातील नागरिक  नगरपरिषदेला घरपट्टी, स्वच्छता, वृक्ष व इतर कर रक्कम नियमित अदा करतात असे असताना देखील नगर परिषदेकडून नागरिकांना कुठलेही प्रकारची मूलभूत सुविधा मिळत नाही. या रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले मात्र सुरुवात व शेवटचे रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रस्ता दुरुस्ती व रस्त्याच्या कडेला पथदिवे बसवण्याबाबत नगरपरिषदेला नागरिकांनी अनेकदा अर्ज करून विनंती केली परंतु नगर परिषदेने नागरिकांच्या अर्जाचा आजवर कुठल्याही  विचार केला नाही. या परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर आहे. शालेय विद्यार्थ्यांना तसेच शेतकर्‍यांना या रस्त्यावरून नियमित जावे लागते . रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्यामुळे नागरिकांना बिबट्याच्या व इतर वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे जीव मुठीत धरून जातात .पावसाळ्यात  रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही परिणामी पावसाच्या पाण्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच नागरिक  अनेकदा या खड्ड्यात पडतात . रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना मणक्याचे विकार सुरू झाले आहे  नगरपरिषदेला अनेकदा विनंती करूनही या रस्त्याची कुठली प्रकारची दुरुस्ती होत नसून व रस्त्याच्या कडेला पथदिवे व पिण्याची पाणी व्यवस्था केली जात नाही  व प्रत्येक वेळी मतदान करून देखील कोणताही प्रश्‍न सुटत नाही असा नागरिकांचा समज झाला असून 13 मे रोजी होणार्‍या शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी या परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अँड भाऊसाहेब सदाफळ, बाबासाहेब लांडगे, दगू सदाफळ, संभाजी सदाफळ, सुनील सदाफळ, गोरख लांडगे, विजय सदाफळ, सुभाष सदाफळ, किरण लांडगे, सत्यम सदाफळ, रेवननाथ सदाफळ, महेश सापिके, महेश मुरादे, सुनील बोठे, योगेश गायकवाड, भाऊसाहेब नाईकवाडी, पांडुरंग सापेकी आशिष कोल्हे, पोपट सदाफळ, दत्तात्रेय सदाफळ, संतोष लांडगे, बाळासाहेब बोठे, प्रवीण बरवंट, शैलेश तारगे, सचिन बोठे, देवेंद्र सदाफळ, प्रवीण मुरादे, पोपट तारगे, शुभम सदाफळ, गोरख सदाफळ, आप्पासाहेब लांडगे, शरद सोनवणे, भास्कर सदाफळ ,अतुल सदाफळ, अरुण सोनवणे, दीपक कानकाटे, रेवन्नाथ तारगे, संतोष मुर्तडक, धोंडीराम कानकाटे, मनोहर तारगे, गणेश लांडगे, माणिक माणिक तारगे,  संकेत लांडगे, दत्तात्रय कानकाटे, अशोक राहीज, अण्णासाहेब तारगे, अमोल शेळके, रामेश्‍वर शेळके, मंगेश तारगे, अण्णा मेचे, रवींद्र मेचे, निलेश कुरे, राजेंद्र मेचे, महेंद्र मेचै, नवनाथ मेचे, किशोर झोडगे, अण्णासाहेब सापिके, अरुण सापिके, सोमनाथ राहीज यांच्यासह शेकडो नागरिकांच्या यावर स्वाक्षरी आहेत.

COMMENTS