Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उर्वरित शेतकर्‍यांना तातडीने अग्रीम पिकविम्याची रक्कम द्या

आमदार आशुतोष काळेंची कृषीमंत्री मुंडेकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ः आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पिक विमा कंपनीला अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून

कारणे देवू नका, कामे तातडीने पूर्ण करा ; आ.आशुतोष काळेंची ठेकेदार अधिकार्‍यांना तंबी
शिर्डी विमानतळासाठी 876 कोटींच्या निधीस मान्यता
श्री साईगाव पालखीचे पूजन करून आ. काळेंनी दिल्या शुभेच्छा

कोपरगाव प्रतिनिधी ः आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पिक विमा कंपनीला अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकर्‍यांना सोयाबीन पिकाचा अग्रीम पिक विमा रक्कम मिळाली असून अनेक शेतकर्‍यांना हि रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे उर्वरित पिक विमा धारक शेतकर्‍यांना तातडीने अग्रीम पिक विमा रक्कम मिळावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील 45,062 शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून एकूण 64,023 शेतकर्‍यांनी पिकविमा अर्ज दाखल केलेले होते. विमा कंपनीच्या निकषानुसार नुकसान होवून देखील शेतकर्‍यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजयजी मुंडे, कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार व जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून पिक विमा कंपनीने प्राथमिक स्वरुपात सोयाबीन पिकाचे अग्रीम पिक विमा रक्कम वाटप केली असून यामध्ये सोयाबीन पिक विमा धारक काही शेतकर्‍यांना अग्रीम पिक विमा रक्कम मिळालेली नाही. यामध्ये एकूण 64,023 पिक विमा धारक शेतकर्‍यांपैकी सोयाबीन-10,000, मका -6,000,बाजरी- 740, कांदा- 435, कपाशी-3,888 व तुर-215 अशा एकूण 21,278 शेतकर्‍यांना अग्रिम पिक विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. मतदार संघातील कोपरगांव, सुरेगांव, दहेगांव, रवंदे, पोहेगांव व पुणतांबा मंडलामध्ये जवळपास दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान होवून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना पिक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शेतकर्‍यांनी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची पर्वा न करता उसनवार व कर्ज घेवून रब्बी हंगामातील पिके उभी केली असून रब्बी हंगामातील पिकांच्या पुढील खर्चाला पिक विमा रक्कमेचा हातभार लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करून कोपरगाव मतदार संघातील उर्वरित शेतकर्‍यांना तातडीने अग्रीम पिक विमा रक्कम देणे बाबत पिक विमा कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजयजी मुंडे यांना दिलेल्या पत्रात केली आहे

COMMENTS