Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी विमानतळासाठी 876 कोटींच्या निधीस मान्यता

आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथील श्री साईबाबा शिर्डी विमानतळाच्या संपूर्ण विकासासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपु

श्री साईगाव पालखीचे पूजन करून आ. काळेंनी दिल्या शुभेच्छा
श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर
श्री साईगाव पालखी सोहळयासाठी आ. काळेंनी मागितली भिक्षा

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथील श्री साईबाबा शिर्डी विमानतळाच्या संपूर्ण विकासासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने शिर्डी विमानतळाच्या सर्वांगीन विकासासाठी 876 कोटी निधीस नवीन प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या देश विदेशातील असंख्य साईभक्तांना श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून विमान तळ विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी2023-24 च्या अर्थसंकल्पात महायुती शासनाने प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी निधी मंजूर करून त्याबाबतच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु शिर्डी विमानतळाचा संपूर्ण विकास होण्यासाठी अधिक निधी मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी उर्वरीत कामांकरीता 876.25 कोटी निधीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये लॅण्डस्केपिंग व सुशोभिकरण, प्रवेशद्वार, विभक्त भिंत, अग्निशामक केंद्रासाठी पाण्याची भूमिगत टाकी आणि क्रॅश गेट्सचे बांधकाम करणे, दोन अतिउच्च दाबाच्या विद्युवाहिन्यांचे वळतीकरण करणे, धावपट्टीचे रीकार्पेटींग व संलग्न कामे, विमानतळामधील पाणी वितरण व सांडपाणी वाहून नेणारी सिस्टिम तसेच पाणी प्रक्रिया केंद्र, सीआयएसएफ कर्मचारी वसाहत, कार्गो कॉम्प्लेक्स, हवाई वाहतूक प्रशिक्षण संस्था इ. साठी आवश्यक असणार्‍या  प्रस्तावित 127 हे. जागेचे भूसंपादन करणे आदी कामांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. महायुती शासनाने जगभरातून येणार्‍या शिर्डीला साई भक्तांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांना प्राधान्य देवून 876.25 कोटी निधीस सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

COMMENTS