Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन – आ. मोनिका राजळे

पाथर्डी प्रतिनिधी - या वर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीपाची पिके जळून गेली आहेत.त्याचबरोबर पिण्

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दहा पोलिसांचा झाला मृत्यू
नवस फेडण्यासाठी चक्क भाविक चालतात विस्तवावरून.
आत्मा मालिकची खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

पाथर्डी प्रतिनिधी – या वर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीपाची पिके जळून गेली आहेत.त्याचबरोबर पिण्याचे पाण्याची टंचाईची परिस्थीती अनेक गावे व वाडया वस्त्यावर निर्माण होत आहे. टँकरने पिण्याचे पाणी देण्याची गंभीर परिस्थीती निर्माण झालेली आहे. या पार्श्चभूमीवर पाथर्डी तालुक्यातील टंचाई परिस्थीती,चा आढावा घेण्याबरोबरच जलजीवन मिशन योजना कामे, वीज प्रश्न, रोहयो कामांची मागणी, जलसंधारण, रस्ते, पाटपाणी, कृषी विभाग, प्रादेशिक पाणी पुरवठा, कायदा व सुव्यवस्था, या सर्व कामांचा व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महसूल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासन, व संबंधीत सर्व विभागाचे प्रमुख यांचे समवेत टंचाई व कामांच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे. त्यानुसार पाथर्डी तालुक्याची टंचाई आढावा बैठक बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वा. गोरे मंगल कार्यालय पाथर्डी येथे होणार आहे. या बैठकीसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.

COMMENTS