Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर मार्केटिंग साठी तालुक्यात एजंटाचा सुळसुळाट : वर्षात डबल करून देणारे आज गायब

फलटण / प्रतिनिधी : सध्या कमी श्रमात जास्त पैसे मिळवून देणार्‍या कंपन्यांनी फलटण तालुक्यात प्रचंड पैसा गोळा केला. यासाठी या कंपन्यांचे एजंट फलटण तालुक

मेणी जलसेतुला मोठी गळती : शेतीला तळ्याचे स्वरुप
जिहे-कठापूरसाठी 697 कोटी मिळणार; जलपूजनासाठी पंतप्रधान खटावला येणार
महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक शेख याने मारले पणुंब्रेचे मैदान

फलटण / प्रतिनिधी : सध्या कमी श्रमात जास्त पैसे मिळवून देणार्‍या कंपन्यांनी फलटण तालुक्यात प्रचंड पैसा गोळा केला. यासाठी या कंपन्यांचे एजंट फलटण तालुक्यातील अनेक गावात रात्रंदिवस काम करीत आहेत. पैसे डबल करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना या लोकांमार्फत गावा गावात पोहचवल्या जात आहेत. यासाठी फलटणमधील मोठ्या आलिशान हॉटेलात व कार्यालयात मिटिंग होतात. गावात मळक्या कपड्यात फिरणारा एजंट आशा मिटिंगमध्ये मात्र सुटा बुटात उपस्थितांना आकर्षित करत आहे.
एकंदरीतच फलटण तालुक्यात कोट्यावधीची माया गोळा करणार्‍या कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून काही सामाजिक काम करणारे व शहरातील प्रतिष्ठित लोकही या कंपनीच्या गळाला लागले आहेत. अनेकांना पैसे डबल करण्याचे आम्ही दाखवल्याने जास्तीत-जास्त लोक पैसे गुंतवणूक करीत आहेत. फलटण शहरातील छोटे व्यवसायिक, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यवसायिक दुकानदार यांनी काही शेअर मार्केटिंग तर काहींनी क्रीपटो करन्सी करणार्‍या कंपनीत पैसे गुंतवणूक केले आहेत. या पैकी अनेकांना माहितीही नाही आपण गुंतवलेले पैसे कोणाकडे गेले किंवा कोणत्या कंपनीत गेले हे पैसे कोणत्या व्यवसायात वापरले जातात हे ही माहिती नाही. त्यांना फक्त एकच माहिती असते पैसे डबल होतात आणि बँकेत जमा होतात.
या पैकी एक दोन कंपन्याचा परतावा बंद होऊन महीने उलटले तरी गुंतवणूकदार काहीही बोलत नाही. कारण पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास हातात काहीच मिळणार नाही. या भीतीने तक्रारही कोणी करत नसल्याचे लक्षात येते आणि सामाजिक प्रतिष्ठा जाईल ते वेगळेच. अशा बोगस कंपनीचे एजंट पुन्हा सक्रिय झाल्याचे व बैठका सुरू झाल्याचे समजते. पोलिसही तक्रार नोंदवा म्हणून अनेकांना विनंती करत आहेत. परंतू तक्रार नोंदवण्यास कुणीही पुढे येत नाही. असा कोणता शेअर आहे ज्यात पैसे गुंतवले की ते वर्षात डबल होतात, असा साधा प्रश्‍न लोक एजंट अथवा कंपनीला विचारत नाहीत. या कंपन्यांची कार्यालये नक्की कोठे आहेत हे ही अनेकाना माहीत नाही.
नुकतीच फलटण तालुक्यातील कोट्यावधीचा शेअर मार्केटचा घोटाळा प्रकरणी बातमी प्रसिध्द होताच सातारा जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील एजंट हवालदिल झाले होते. सर्व गुंतवणूकदार आपल्या पैशाचे काय अशी एजंटला विचारत होते. एकंदरीतच चर्चा ही फक्त शेअर मार्केटची रंगली होती. त्यावेळी हे एजंट त्या बातमीचा आपल्या कंपनीचा संबंध नाही, अशी खोटे बोल बोलत होती. प्रत्येकजण एजंट पैसे माघारी देण्याची वेळ येईल म्हणून बोलले टाळत होते. पैशासाठी सतत फोनवर फोन येत असल्याने एजंट उघडलेल्या दुकानांना टाळे लागते की काय अशी सांशकता मनात आणत होते.
आता सर्वांशी लक्ष लागले आहे ते शासनाच्या विविध विभागाकडून खास करून ईडीकडून होणार्‍या चौकशीबाबत सर्वात महत्त्वाचे यावेळी असे आहे की आज अखेर बोगस कंपनीची चौकशी होत होती. पण यावेळी चौकशी अधिकारी एजंट व गुंतवणूकदार यांनाही चौकशीतून सोडणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक काळा पैसा डबल पांढरा करणार्‍या गुंतवणूकदार यांची यावेळी खैर नाही हे नक्की.

COMMENTS