Homeताज्या बातम्यासंपादकीय

संसदेवरील चढाई आणि…. 

 काल संसदेच्या नव्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून दोन तरुणांनी अचानक स्मोक बॉम्बचा मारा केला; तर, दुसऱ्या दोन तरुणांनी संसदेच्या बाहेर

अहिल्या नव्हे, अहल्यादेवी होळकर ! 
सर्वच आता निवडणूकमय ! 
सत्ताकारणाचा केंद्रबिंदू माणूसच असावा ! 

 काल संसदेच्या नव्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून दोन तरुणांनी अचानक स्मोक बॉम्बचा मारा केला; तर, दुसऱ्या दोन तरुणांनी संसदेच्या बाहेर म्हणजे संसदेच्या प्रांगणातच स्मोक बॉम्बचा हल्ला केला. या घटनेत एकूण सहा जणांचा समावेश असल्याची माहिती आता स्पष्ट झाली आहे. यामध्ये सहभागी असलेले हे तरुण वेगवेगळे शिक्षण किंवा पदव्या घेतलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये काही रिक्षा चालक किंवा ड्रायव्हर असणारे देखील आहेत. शिवाय या तरुणांचा सहभाग वेगवेगळ्या राज्यातून आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा कर्नाटक, महाराष्ट्र त्यामुळे अखिल भारतीय पातळीवरून हे तरुण एकत्र आले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने संसदेवर एक प्रकारे हल्ला चढवला ते पाहता ते प्रशिक्षित आहेत, असं सकृतदर्शनी कोणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या सार्वभौम सभागृहात एवढ्या मोठ्या घटनेला परिणाम देताना, त्या तोडीचा आत्मविश्वास असावा लागतो. केवळ चार तरुण एकत्र आले म्हणून, असा आत्मविश्वास निर्माण होत नाही. त्यासाठी या तरुणांचे प्रशिक्षण झाले असावे, या शंकेला वाव मिळतो म्हणून या शंकेचे निरसन होणे गरजेचे आहे. शिवाय या तरुणांनी संसदेच्या प्रांगणात ज्या पद्धतीने आक्रमण केलं आणि एवढं असून सुद्धा पोलीस त्यांना केवळ सहजपणे चालवत नेत असल्याचा पोलिसांचा व्हिडिओ दिसतो. ही कृती देखील अतिशय संताप जनक आहे. कारण, गेल्या काही वर्षांपासून लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांना पोलीस अक्षरशः उचलून फेकण्याचे काम करत असतात. मात्र या तरुणांना पोलीस सहजपणे चालवत नेत आहेत; ही पोलिसांची कामगिरी देखील एक प्रकारे संशय निर्माण करणारी आहे. शिवाय संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत ज्या पद्धतीने यातील दोन तरुणांना प्रवेश मिळाला, ते पाहता तो प्रवेश काही पहिल्यांदाच मिळालेला नाही, असं त्यांच्या कृतीवरून स्पष्ट होतं. कारण संसदेत एखादी गोष्ट घडवायची असेल तर त्याचा सराव बरेच दिवस केल्याशिवाय ते शक्य होऊ शकत नाही. जे तरुण प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून आत मध्ये गेले त्यांनी ही गोष्ट ठामपणे सांगितले आहे की, संसदेमध्ये जाताना बुटांची तपासणी होत नाही. त्यामुळे आम्ही स्मोक बॉम्ब बुटांमध्ये नेले. अर्थात जे बूट त्यांनी वापरले, ते देखील विशेष प्रकारचे बनवलेले असले पाहिजेत. कारण, ज्या बुटांमध्ये पाय टाकल्यानंतर त्यामध्ये जागाही राहत नाही, अशा बुटांमध्ये एखादी वस्तू लपवून आणणं, ही त्या बुटांची रचना देखील विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याशिवाय होवू शकत नाही. २२ वर्षांपूर्वी संसदेवर जो अतिरेकी हल्ला झाला होता, अगदी त्या हल्ल्याच्या वार्षिकी किंवा त्या हल्ल्याच्या बाविसाव्या वर्षी, अशा प्रकारचं कृत्य करणे म्हणजे या तरुणांना त्या अतिरेकी कृत्याशी आपलं काही साम्य व्यक्त करायचं होतं का? हा प्रश्न निर्माण होतो. या तरुणांमधील काही जणांनी आपल्याला रोजगार मिळाला नाही किंवा आपण बेरोजगार आहोत म्हणून अशा प्रकारचं कृत्य आपण सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केलं, असं जर म्हणत असतील तर या संदर्भात त्यांनी यापूर्वी काही आंदोलन केली आहेत का? जर केली असतील तर त्यांनी अखिल भारतीय पातळीवर अशी काही आंदोलने केली आहेत का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, की ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, ते आरोपी हे निश्चितपणे एकत्र आल्यानंतर त्यांनी काही दिवस या गोष्टींचा सराव केला असावा. त्यातल्या त्रुटी त्यांनी हेरलेल्या आहेत. गुन्ह्याचा सराव करत असताना आपण काय दक्षता घ्यावी, याची देखील त्यांनी काळजी घेतली आहे. म्हणूनच उर्वरित चार तरुणांकडे असणारे मोबाईल, त्यातील आरोपी नंबर ६ ने आधीच पळवलेले आहेत. त्यांच्याकडील कोणत्याही संभाषणाचे पुरावे किंवा सबूत मिळू नयेत याची दक्षता त्यांनी घेतली आहे. ही दक्षता केवळ त्यांनीच घेतली असावी असं नाही, तर, त्यांना या संदर्भात कोणी प्रशिक्षण  दिल आहे का? या प्रश्नांभोवती ही चौकशी व्हायलख हवी!

COMMENTS