बैलगाडी शर्यतीला राज्यशासनाकडून पाठबळ मिळावे यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलगाडी शर्यतीला राज्यशासनाकडून पाठबळ मिळावे यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

अहमदनगर : बैलगाडी शर्यतीला ही इतर खेळाप्रमाणे राज्यशासना कडून पाठबळ मिळावे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्

सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे
belapur – लव्ह जिहाद प्रकरणी भव्य मोर्चा l LokNews24
पाथर्डी तालुक्यात पावसाचा हाहाःकार

अहमदनगर : बैलगाडी शर्यतीला ही इतर खेळाप्रमाणे राज्यशासना कडून पाठबळ मिळावे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे‌ यांनी आज येथे दिली.

कर्जत-जामखेड एकात्मिक सोसायटीच्या वतीने कर्जत येथे महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री कु. आदिती तटकरे‌ यांची होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ऊर्जा व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष आशुतोष काळे, बैलगाडी शर्यतीचे आयोजक तथा आमदार रोहीत पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.दिलीप बनकर, आ.अशोक पवार, आ.संजय शिंदे, आ.अनिल पाटील, आ.यशवंत माने, आ.अशोक काळे, आ.ऋतुराज पाटील, आ.निशांत सिद्दीकी, आ.इंद्रनिल नाईक आदी उपस्थित होते. राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे अत्यंत अवघड काम असते. या शर्यतीत बैलांना तसेच प्रसंगी माणसांना ही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना महाराष्ट्रात या शर्यतीचे यशस्वी आयोजन होत आहे. यात आयोजक व शेतकरी यांचे कौशल्य आहे. यावेळी उपस्थित राज्यमंत्र्यांनी व आमदारांनी बैलगाडी शर्यतीच्या चुरशीच्या लढतीचा आनंद घेतला. तत्पूर्वी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ चौंडी येथे सीना नदीवरील घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण कामांचा भुमिपूजन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे‌ यांच्याहस्ते करण्यात आले. राज्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार रोहीत पवार उपस्थित होते.

COMMENTS