Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक

मसूर / वार्ताहर ः मसूर, ता. कराड येथील माजी सरपंच प्रकाश दिनकर माळी यांच्या राहत्या घरातील फ्रिज शेजारील पावर पॉइंट शॉर्टसर्किट झाल्याने फ्रिज, म

सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
स्वातंत्र्य वीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर
कराड आगारातील चालकाचा हृदय विकाराने मृत्यू

मसूर / वार्ताहर ः मसूर, ता. कराड येथील माजी सरपंच प्रकाश दिनकर माळी यांच्या राहत्या घरातील फ्रिज शेजारील पावर पॉइंट शॉर्टसर्किट झाल्याने फ्रिज, मिक्सर, टीव्ही, फर्निचर, दरवाजे, खिडक्या, संसारोपयोगी साहित्यासह, किमती साहित्य जळून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे जागृत ग्रामस्थांच्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मसूर येथील ब्रह्मपुरी भागात माजी सरपंच प्रकाश माळी यांचे मोठे घर आहे. घरातील बहुतांशी मंडळी व्यवसायानिमित्त बाहेर असतात काल प्रकाश यांचे थोरले बंधू देविदास हे पाणी पिण्यासाठी फ्रिजचा दरवाजा उघडताच जोरदार स्फोट होऊन आगीचा लोळ बाहेर पडला. हे शॉर्टसर्किट इतके भयानक होते की यामध्ये फ्रिजसह मिक्सर, टीव्ही, घरातील सर्व फर्निचर, दरवाजे, खिडक्या, प्लंबिंग, स्लाइडिंग, सिलिंग, फॅन, बल्ब, टुब, संपूर्ण विजेचे वायरिंग, किचनमधील प्लॅस्टिक बरण्यामधील असणारे सर्व कडधान्य जळून खाक झाले. गृहपयोगी साहित्याची नासधूस झाली. याबाबतची माहिती मिळताच कुटुंबासह आजूबाजूचे ग्रामस्थ तसेच इलेक्ट्रिशियन प्रशांत वेल्लाळांनी प्रसंगावधान राखून फ्रीजचा कॉम्प्रेशिव व गॅस सिलेंडर बाहेर काढलेने पुढील संभाव्य धोका टळला. ग्रामस्थांच्या मदतीने आगीतून वाचलेल्या सर्व साहित्य बाहेर काढले. तसेच ग्रामपंचायत पाण्याचा टँकर व माळी यांच्या विहिरीच्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या शॉर्टसर्किटने झालेला आगीत माळी कुटुंबियांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच मसूर दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल देशमुख हवलदार डांगरे तसेच तलाठी खुडे, युनायटेड इन्शुरन्स कंपनीचे मोरे, अर्बन बँक मसूरचे शाखा प्रमुख भोकरे, शहाजीराव जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेत नुकसानीचा पंचनामा केला.
काल मसूर परिसरात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला होता. त्यातच माळी कुटुंबीयांच्या घरातील दारे खिडक्या बंद अवस्थेत होते. उष्णतेची धग व त्यातच झालेले शॉर्टसर्किट यांचा मिलाप इतका जोराचा होता की घराच्या रंगानेही पेट घेतला होता. विजेचे साहित्य वितळलेले होते. सिलिंग फॅन वाकला होता. याशिवाय फरशा ही उचकटल्या होत्या. विशेष म्हणजे सदर माळी कुटुंबियांची 19 लहान-मोठे सदस्य आहेत. एवढे मोठे कुटुंब असले तरी बहुतांशी सदस्य बाहेरच कामानिमित्त तर काही शेतात असतात. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अचानक झालेल्या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजय जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कोरे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे यांनी भेट दिली.

COMMENTS