Homeताज्या बातम्यादेश

अपमानाच्या रागातून मुलाने वडील आणि आजोबांची हत्या केली

नोयडा प्रतिनिधी - अपमान केल्याच्या रागातून मुलाने वडील आणि आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर आरो

मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या
पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
पोटच्या पोरीनच आईला संपवलं.

नोयडा प्रतिनिधी – अपमान केल्याच्या रागातून मुलाने वडील आणि आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपीने आपले कपडे धुत घरी गेला. पोलिसांनी ग्रेटर नोएडातील यमुना प्राधिकरण क्षेत्रातील सेक्टर-२२ डी येथील बल्लुखेडा गावात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. एका सोशल मीडिया आर्टिस्टच्या मुलाने वडील आणि आजोबांचा फावड्याने वार करून खून केला. भांडणात वडिलांनी अपमान केल्यामुळे पोराने हे हत्याकांड घडवून आणले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विक्रमजीत असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मोठा मुलगा जस्मिनने ही घटना घडवून आणली होती. अटकेनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. एडीसीच्या म्हणण्यानुसार, जस्मीन असे आरोपीचे नाव आहे. मृत विक्रमजीत हा कुटुंबाची काळजी न घेता अनेकदा पत्नी आणि मुलाचा अपमान करत होता. विक्रमजीतने त्याची सर्व संपत्ती ही गर्लफ्रेंड आणि दारूवर उडवल्यामुळे त्याच्यावर सर्व रागावले होते. दरम्यान, रक्षाबंधनाच्या दिवशी विक्रीमजीत आणि मुलगा जॅस्मिन यांच्यात कडक्याचे भांडण झाले. यावेळी जॅस्मिनचा मुलगा, पत्नी आणि मुली देखील समोर होत्या. हा अपमान सहन न झाल्याने आरोपी जस्मीनने रागाच्या भारत वडिल विक्रमजीत यांची हत्या केली. आरोपीला वडिलांची सर्व संपत्ती विकून कर्जातून मुक्त व्हायचे होते.

COMMENTS