Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय भूमिकेतील ईव्हीएम !

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन व्यक्तींनी महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या  त्यातील एक होते लालूप्रसाद यादव आणि दुसरे होते योगेंद्र

न्यायपालिकेचे खडेबोल!
भागवतांचे पापक्षालन तर पवारांचे सौ चुहे खाके…..!
ओबीसींवर अन्याय कराल, तर, परिणाम भोगाल ! 

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन व्यक्तींनी महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या  त्यातील एक होते लालूप्रसाद यादव आणि दुसरे होते योगेंद्र यादव. लालूप्रसाद यादव हे राजकीय व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांपेक्षाही लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील अडवलेली रथयात्रा, याची किंमत त्यांना मोजावी लागली. दीर्घकाळ त्यांना चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात राहावे लागले. योगेंद्र यादव यांनी २०१४ मध्ये प्रतिक्रिया देताना, नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले तर, देशाच्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर उतरावे लागेल, असे म्हटले होते. योगेंद्र यादव यांची ही प्रतिक्रिया, केवळ नागरिकांपर्यंतच मर्यादित राहिली नाही; तर, देशाच्या सार्वभौम सभागृहातील खासदार असलेल्या आणि देशाच्या सत्तेची सत्तर वर्ष जवळपास आपल्या हातात ठेवलेल्या काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांना देखील रस्त्यावर उतरावे लागले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढताना संपूर्ण भारतात एकच गोष्ट ते सांगत राहिले; ती म्हणजे वर्तमान काळात विरोधी पक्षांना देखील संसदेत बोलू दिले जात नाही! जनतेचे प्रतिनिधित्व करणारे विरोधी पक्ष नेते यांचा आवाज संसदेत देखील बंद केला जातो; त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून नागरिकांशी थेट संवाद साधावा लागला, यातून ही बाब सिद्ध झाली! राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची जेवढी खिल्ली भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया मधून करण्यात आली, तेवढी अन्य कोणत्याही नेत्याच्या वाट्याला आली नाही! राहुल गांधी हे सर्व प्रयत्न करत असताना भारत जोडो या पदयात्रेनंतर राहुल गांधींच्या व्यक्तिमत्त्वावर एवढा निखार आला की, त्यांचा आवाज हा प्रमाण होऊ लागला! संसदेत त्यांनी दिलेले भाषण आणि मोदी – अडाणी संबंधावर उपस्थित केलेले प्रश्न, आजही देशासमोर अनुत्तरीत आहे! काल-परवा राहुल गांधी यांनी लद्दाख भूमीवर जाऊन आगामी राजकीय जय – पराजय कोणाचा असेल, असे थेट वक्तव्य केले. असे असले तरीही, विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांकडून अधून मधून प्रश्न उपस्थित केला जात आहे भाजपच्या एका खासदांना खासदाराने तरी या संदर्भात आपली थेट ध्वनिचित्र फीत बनवून प्रसारमाध्यमांवरच ती टाकली आणि कोणालाही मतदान केले तर, ते भाजपालाच कसे येईल, असे थेट बोलून दाखवले. महाराष्ट्राचे ठाण्याच्या मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांद्रयान-३  मोहीम यशस्वी झाल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये व्यक्त होताना, जर भारताच्या एका ठिकाणाहून चंद्रावर उतरलेल्या यानाला नियंत्रित केले जात असेल तर, ईव्हीएम सारखे मशीन देखील अशा प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकते! असा विषय त्यांनी उपस्थित केला आहे. अर्थात, ईव्हीएमच्या विषयावर बोलताना काँग्रेस अजूनही उघडपणे काही बोललेली नाही किंवा त्या संदर्भात ठोस अशी भूमिका घेत नाही. याउलट, काँग्रेसचे म्हणणे असे असते की, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि काही प्रमाणात कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती काय आहे, हे आपण पाहतो. जर इव्हीएम च्या माध्यमातून त्यांना निवडणुका मॅनेज करता येत असतील, तर मग तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्यांना तसे का करता येत नाही? अर्थात, हा तर्कशुद्ध प्रश्न असला तरी देखील त्याच्यामध्ये राजकीय मानसशास्त्रही दडलेलं असतं. बहुतांशपणे, भारतीय जनता पक्ष हा काऊ बेल्ट किंवा गोपट्टा ज्याला म्हणता येईल, अशा उत्तर भारतातच त्यांनी आपले राजकीय प्रयोग केले आहेत. ईव्हीएम सारख्या गोष्टी अलीकडे कितपत लागू होतील किंवा यापूर्वी कितपत लागू झाल्या, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. २०१४ मध्ये काँग्रेसच्या विरोधात जनमत फार विरोधात झाले होते. त्याचा परिणाम थेट मतदानावर झाला होता. मात्र, २०१४ मध्ये जी परिस्थिती काँग्रेसच्या विरोधात उभी राहिली होती, तीच परिस्थिती आगामी २०२४ मध्ये भाजपा संदर्भात उभी राहते आहे काय? हा देखील आगामी काळातील राजकीय स्थित्यंतरे पाहण्यासाठी एक महत्त्वाचा विषय आहे.

COMMENTS