समानतेच्या दिशेने…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समानतेच्या दिशेने…

कधी काळी चूल आणि मूल यापर्यंत सीमित ठेवणार्‍या स्त्रियांना संधी मिळाल्यानंतर त्या आज जगभरात सर्वत्र मुक्त संचार करतांना दिसून येत आहे. त्यांना संधी म

विकासाचा विरोधाभास
अदानी समूह संशयाच्या फेर्‍यात
काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?

कधी काळी चूल आणि मूल यापर्यंत सीमित ठेवणार्‍या स्त्रियांना संधी मिळाल्यानंतर त्या आज जगभरात सर्वत्र मुक्त संचार करतांना दिसून येत आहे. त्यांना संधी मिळाल्यामुळे त्या संपूर्ण जग आपल्या कर्तृत्वाने गाजवत असतांना, महिला अत्याचाराच्या घटना बघितल्या किती ही विकृती. आजही पुरूषी मन स्त्रियांकडे केवळ भोगण्याची वस्तू म्हणून बघत असल्याने या विकृत समाजाची कीव करावीशी वाटते. स्त्री आणि पुरूष हे एकाच रथाचे दोन चाक असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात या दोन चाकापैकी एका चाकावर सातत्याने अन्याय अत्याचार केला जातो. एक चाक नेहमीच कमकुवत केले जाते. त्यामुळे एक चाक सशक्त आणि दुसरे चाक अशक्त आपणच आपलीच समाजव्यवस्था करतांना दिसून येत आहे. देशाचा, समाजाचा, कुटुंबाचा विकासाचा वेग वाढवायचा असेल तर, दोन्ही चाके सम-समान पातळयांवर धावली पाहिजे. दोघांना समान सुविधा मिळाल्या पाहिजेत. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते. घरात लहानपणापासून मुलीला दुय्यमत्व दिले जाते. मुलगा असेल तर त्याला सर्व सुख, सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र मुलींना त्याप्रमाणात अल्प सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मुलाची चुक असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते, किंवा त्याची पाठराखण केली जाते. मात्र मुलीची चुक असेल, तर त्याकडे किंचितही दुर्लक्ष केले जात नाही. किंबहूना पाठराखण तर दूरच राहिली. तिला त्या चुकीची शिक्षा भोगावीच लागते. त्यामुळे समाजातील ही विषमताच महिला अत्याचाराला कारणीभूत आहे. आजही स्त्रिया या केवळ चूल आणि मुल यापुरत्याच मर्यादित असल्याची पुरुषी मानसिकता अजूनही जाता जात नाही. त्यामुळे स्त्री ही केवळ उपभोगण्याचे साधन असल्याची विकृतता घालवण्याची गरज आहे. आज स्त्रिया सीमेवर देखील मर्दमुखी गाजवत आहे. गगनाच उंच झेप आहे. अवघे आकाश तिने आपल्या कवेत घेतले आहे. स्त्रिया प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत असतांनाच, कालच राष्ट्रीय महिला आयोगाचा एक अहवाल समोर आला. यात देशातील महिला अत्याचारात 30 टक्के वाढ झाली असून, उत्तरप्रदेश यात अव्वल असल्याचे समोर आले आहे.
भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आपण अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतांनाच, महिलांची देशातील आजची परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरूष समानता खर्‍या अर्थाने रुजवण्यासाठी व्यापक मोहीम आपल्याला हाती घ्यावी लागणार आहे. या अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी तब्बल 31 हजार महिला अत्याचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाने दिली आहे. 2014 नंतर सर्वाधिक तक्रारी 2021 मध्ये नोंदवण्यात आल्याचे देखील आयोगाने स्पष्ट केले. एकूण तक्रारींपैकी अर्ध्याहून अधिक तक्रारी एकट्या उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आल्या. राष्ट्रीय महिला आयोगानूसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये महिलांविरोधातील अत्याचाराच्या तक्रारींमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. एनसीडब्ल्यूच्या आकडेवारीनूसार 30 हजार 864 तक्रारींपैकी 11 हजार 13 तक्रारी महिलांच्या भावनात्मक शोषण लक्षात घेता त्यांना सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकारासंबंधी होती. घरगुती हिंसाचाराशी संबंधीत 6,633 तसेच हुंड्यासाठीच्या जाचासंबंधी 4 हजार 589 तक्रारी प्राप्त झाल्या.सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात महिलांविरोधात गुन्ह्यांसंबंधी सर्वाधिक 15 हजार 8228 तक्रारी प्राप्त झाल्या. उत्तर प्रदेश पाठोपाठ दिल्ली 3,336, महाराष्ट्र 1,504, हरियाणा 1,460, तसेच बिहारमध्ये 1 हजार 456 तक्रारी वर्षभरात मिळाल्या. 2014 नंतर एनसीडब्ल्यूला 2020 मध्ये सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. या संपूर्ण आकडेवारीवरून महिला अत्याचारात वाढ झाल्याचे समोर येत असले तरी, अजूनही अनेक महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही, हे कटू सत्य आहे. त्यामुळे ही नेमकी आकडेवारी समोर येत नाही. महिलांना नेहमीच आर्थिक स्वयंपूर्ण होऊ दिले जात नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी मोठयाप्रमाणावर उपाययोजना आपल्याला हाती घ्याव्या लागणार आहेत.

COMMENTS