Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 लोकसभेसाठी शांतिगिरीजी महाराजांची यंत्रणा गतिमान 

जय बाबाजी भक्त परिवाराची १० फेब्रुवारी पासून दोन दिवसीय नियोजन बैठक

नाशिक प्रतिनिधी - लोकसभेचे वारे सर्वत्र वाहत असतांना नाशिक मध्ये महाविकास आघाडी,महायुतीचे अजूनही काही  ठरेना. त्यामुळं जवळपास सर्वच  इच्छुक गोंध

परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा जय बाबाजी परिवाराचा निर्धार 
जय बाबाजी भक्त परिवार शांतिगिरीजी महाराजांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार  
सिन्नर तालुक्यात शांतिगिरीजी महाराजांचे नागरिकांनी केले उत्फुर्त स्वागत 

नाशिक प्रतिनिधी – लोकसभेचे वारे सर्वत्र वाहत असतांना नाशिक मध्ये महाविकास आघाडी,महायुतीचे अजूनही काही  ठरेना. त्यामुळं जवळपास सर्वच  इच्छुक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.त्यांना ‘वेट अँड वाच’ शिवाय दुसरा पर्याय दिसत नसतांना अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची लाखों भाविकांची फौज गेल्या कैक दिवसांपासून नियोजनबधरित्या प्रचार कार्याला लागली आहे.

    नाशिक लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोणी बदनामी करून इच्छुकांचे तिकीट कापण्यात व्यस्त आहे तर कोणी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेऊन आपली फिल्डिंग लावत आहे.तर कोणी दबाव तंत्राचा वापर करून मीच योग्य उमेदवार असल्याचे भासवत आहे.नाशिक मधून  हेमंत गोडसे,दिनकर पाटील, नितीन ठाकरे,राहुल ढिकले,स्वामी कंठानंद महाराज आदींसह जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहाखातर देशसेवा व राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.निवडणुकीसाठी जवळपास सर्वच उमेदवार सज्ज झाले असतांना महाविकास आघाडी व महायुतीचे अजूनही उमेदवारी बद्दल स्पष्ट संकेत आलेले नसल्याने  सर्वच उमेदवार बुचकळ्यात पडलेले असतांना  महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांचा राज्यभरातील भक्त परिवार स्वामींना कुठल्याही परिस्थितीत  विजयी करायचेच यासाठी केव्हाच कामाला लागला आहे.

भक्त परिवाराचे गेल्या कैक दिवसांपासून नियोजनबद्धरित्या प्रचार कार्य सुरू आहे. राजकारणाच्या शुद्धीकरणाचे ध्वजारोहण करून प्रचार कार्याचा आरंभ करण्यात आला. राज्यभरातील भाविक  आपल्या नाशिकस्थित नातेवाईकांचे संपर्क अभियान राबवत आहे.त्यात शांतिगिरीजी महाराजांची देशभक्ती साठीची भूमिका समजावून सांगत आहे. येत्या  १० व ११ फेब्रुवारी दरम्यान जय बाबाजी भक्त परिवाराची बैठक व मेळावा नाशिक येथे हनुमान वाडी परिसरातील श्रद्धा लॉन्स येथे संपन्न होणार आहे.उमेदवारी बद्दलच्या  भूमिकेसह बूथ यंत्राणा व प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीस आलेले कार्यकर्ते पूर्णवेळ प्रचार कार्यात देणार आहे.इतर उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत असतांना महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या  राज्यभरातील भाविकांची फौज मतदार व आपल्या नाशिक येथे असलेल्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे.दरम्यान इतर उमेदवारांच्या तुलनेत महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांची प्रचार यंत्रणा गतिमान होतांना दिसत आहे.जय बाबाजी भक्त परिवाराने नाशिक मधून सर्वात पहिले शांतिगिरीजी महाराजांची उमेदवारी जाहीर करून प्रचारात देखील आघाडी घेतली आहे.स्वामींच्या विजयासाठी भक्त परिवार जोरदार तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.

COMMENTS