सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

Homeताज्या बातम्या

सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

अहमदनगर : परमीट रूम, हॉटेल, दुकाने, चहाचे हॉटेल यांना सरपंच किंवा उपसरपंच अशी नावे दिल्याचे पाहायला मिळते. मात्र, अशी नावे देणे हा त्या संवैधानिक पदा

BREAKING: नाशिकच्या डॉ. जाकीर हुसेन मनपा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती २२ रुग्ण दगावले | Lok News24
वर काजूच्या गोण्या..त्याखाली दारूचे बॉक्स
कोल्हे कारखान्यात मोफत सर्वरोग निदान शिबीर उत्साहात; नियमित व्यायाम आणि संतुलित आहारानेच आरोग्य सुधारेल – बाळासाहेब वक्ते

अहमदनगर : परमीट रूम, हॉटेल, दुकाने, चहाचे हॉटेल यांना सरपंच किंवा उपसरपंच अशी नावे दिल्याचे पाहायला मिळते. मात्र, अशी नावे देणे हा त्या संवैधानिक पदांचा अवमान असून ती रद्द करण्यात यावीत, अशी मागणी राहुरी तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण अंत्रे यांनी केली आहे. अंत्रे यांनी यासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन अशी नावे कोणी दिली, त्यांची नोंदणी कोणी केली याची चौकशी करून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन अंत्रे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविले आहे.अंत्रे यांनी म्हटले आहे की, सरपंच या पदाला कायद्याने मोठे महत्त्व आहे. आपण सरपंचांना गावाचे प्रथम नागरिक समजतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958-59 मधील कलम 30 नुसार ही पदे संवैधनिक आहेत. त्यांचा वापर अलीकडे व्यवसायाची नावे आणि जाहिरातीसाठी केला जात आहे. कापड दुकान, बार, रेस्टॉरंट, चहाची हॉटेल अशा अनेक ठिकाणी ही नावे पाहायला मिळतात. अशी नावे घेऊन नोंदणीसाठी गेलेल्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून अगर अन्य नोंदणी कार्यालयांकडून परवाने कसे मिळतात? हे योग्य आहे का? याची चौकशी करण्यात यावी. रस्त्याने जाताना हॉटेल, ढाबा व अन्य ठिकाणी सरपंच, उपसरपंच अशी नावे वाचून अक्षरशः चीड येते. या संवैधानिक पदाच्या नावांचा अशा प्रकारे दुरुपयोग व अपमान होत आहे. प्रशासन आणि सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर भविष्यात अनेक आस्थापना, बार, अथवा हॉटेलांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार अशी नावे दिलेली पहायला मिळतील. या प्रकारामुळे या महत्वाच्या पदाबरोबरच आपला महाराष्ट्र अपमानित होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असेही अंत्रे यांनी म्हटले आहे.

COMMENTS