महिलेच्या केसावर थुंकणार्‍या जावेद हबीबवर गुन्हा दाखल करावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या केसावर थुंकणार्‍या जावेद हबीबवर गुन्हा दाखल करावा

अहमदनगर-हेअर आर्टिस्ट जावेद हबीब यांनी हेअरकट व ब्युटीपार्लर सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या महिलेच्या केसांमध्ये थुुंकल्यामुळे महिलांचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने  निदर्शने करुन जावेद हबीब याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शांताराम राऊत, विकास मदने, जनार्दन वाघ, सुनिल वाघमारे, किशोर मोरे, संजय मदने, शरद दळवी, नवनाथ मदने, बापू क्षीरसागर, अशोक खामकर आदि उपस्थित होते.      जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसिद्ध हेअर आर्टिस्ट जावेद हबीब यांनी काही दिवसापूर्वी मुज्जफरनगर येथे हेअरकट व ब्युटीपार्लर सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या हेअरकट स्टाईलचा डेमो देण्यासाठी स्टेजवर आमंत्रित केले. या सेमिनारचा सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जावदे हबीब यांनी त्या महिलेच्या केसांमध्ये सेंटर लाईन काढून जर तुमचे केस खराब असतील आणि त्यासाठी पाणी नसेल तर थुंकीने धुवा, असे म्हणत त्या महिलेच्या केसांमध्ये स्वत: जावेद हबीब हे थुंकल्याचे दिसत आहे. अशा असभ्य, असंस्कृत व अस्वच्छ कृतीचे समर्थ करतांना दिसत आहेत.एका सभ्य महिलेबरोबर उपस्थित लोकांसमोर असे वर्तन करणे म्हणजे एक प्रकारे महिलांचे चारित्रहनन व मानहानी केल्याचा प्रकार आहे. असा प्रकार घडत असतांना त्यांना कोणीही अडवले नाही कि जाब विचारला नाही हे खेदजनक आहे.   जावेद हबीब हा अशा कोणत्या टिप्स देईल व हेअरकटच्या नावाखाली असभ्य वर्तन करील याची शाश्वती राहिलेली नाही.  तेव्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारिणी या कृत्याचा जाहीर निषेध करते. सध्या कोरोनाचा काळ आहे. या काळात तोंडाला मास्क, हॅण्डग्लोज न वापरता अशा प्रकारे महिलांच्या केसावर थुंकून कोरोना प्रसार करीत आहे.सलून व्यवसाय हा नाभिक समाजाचा मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि ग्राहक हा देवता आहे. हा जावेद हबीब केसावर थुंकून हा एकप्रकारे आमच्या देवतांचा अपमान करत आहे. अशी वर्तवणुक करणार्‍या या जावेद हबीब याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.याप्रसंगी मनोज शिंदे, निलेश शिंदे, अरुण वाघ, विशाल मदने, संतोष ताकपेरे, सागर अमेदकर, अतुल वाघमारे, मेहेर जाधव, सनी राऊत, सत्तार शेख, शंकर सोनटक्के आदि उपस्थित होते.

माजी नगरसेवक कैलास गिरवलेंना मारहाण करणार्‍या पोलिसांवर गुन्हा
कोपरगावचे डॉ. रामदास आव्हाड यांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार प्रदान
संजीवनीच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र  संघात निवड

अहमदनगर-हेअर आर्टिस्ट जावेद हबीब यांनी हेअरकट व ब्युटीपार्लर सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या महिलेच्या केसांमध्ये थुुंकल्यामुळे महिलांचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने  निदर्शने करुन जावेद हबीब याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शांताराम राऊत, विकास मदने, जनार्दन वाघ, सुनिल वाघमारे, किशोर मोरे, संजय मदने, शरद दळवी, नवनाथ मदने, बापू क्षीरसागर, अशोक खामकर आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसिद्ध हेअर आर्टिस्ट जावेद हबीब यांनी काही दिवसापूर्वी मुज्जफरनगर येथे हेअरकट व ब्युटीपार्लर सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या हेअरकट स्टाईलचा डेमो देण्यासाठी स्टेजवर आमंत्रित केले. या सेमिनारचा सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जावदे हबीब यांनी त्या महिलेच्या केसांमध्ये सेंटर लाईन काढून जर तुमचे केस खराब असतील आणि त्यासाठी पाणी नसेल तर थुंकीने धुवा, असे म्हणत त्या महिलेच्या केसांमध्ये स्वत: जावेद हबीब हे थुंकल्याचे दिसत आहे. अशा असभ्य, असंस्कृत व अस्वच्छ कृतीचे समर्थ करतांना दिसत आहेत.एका सभ्य महिलेबरोबर उपस्थित लोकांसमोर असे वर्तन करणे म्हणजे एक प्रकारे महिलांचे चारित्रहनन व मानहानी केल्याचा प्रकार आहे. असा प्रकार घडत असतांना त्यांना कोणीही अडवले नाही कि जाब विचारला नाही हे खेदजनक आहे.   जावेद हबीब हा अशा कोणत्या टिप्स देईल व हेअरकटच्या नावाखाली असभ्य वर्तन करील याची शाश्वती राहिलेली नाही.  तेव्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारिणी या कृत्याचा जाहीर निषेध करते. सध्या कोरोनाचा काळ आहे. या काळात तोंडाला मास्क, हॅण्डग्लोज न वापरता अशा प्रकारे महिलांच्या केसावर थुंकून कोरोना प्रसार करीत आहे.सलून व्यवसाय हा नाभिक समाजाचा मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि ग्राहक हा देवता आहे. हा जावेद हबीब केसावर थुंकून हा एकप्रकारे आमच्या देवतांचा अपमान करत आहे. अशी वर्तवणुक करणार्‍या या जावेद हबीब याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.याप्रसंगी मनोज शिंदे, निलेश शिंदे, अरुण वाघ, विशाल मदने, संतोष ताकपेरे, सागर अमेदकर, अतुल वाघमारे, मेहेर जाधव, सनी राऊत, सत्तार शेख, शंकर सोनटक्के आदि उपस्थित होते.

COMMENTS