नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

Homeताज्या बातम्या

नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

पत्र लिहून मुंबईतल्या विकासकामांबाबत नोंदवला आक्षेप जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करावी

भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून मुंबईतल्या विकासकामांबाबत आक्षेप नोंदवलाय.

घोषणांचा पाऊस ; अंमलबजावणीचा प्रश्न!
सौर ऊर्जेवर आधारित विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना शासन आणणार : मुख्यमंत्री फडणवीस
राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून मुंबईतल्या विकासकामांबाबत आक्षेप नोंदवलाय. आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्यावरही नितेश राणेंनी या पत्राद्वारे निशाणा साधलाय. टक्केवारी देणाऱ्या विकासकांमुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जातेय आणि मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे, अशा उलट्या बोंबा मारणं आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडून सुरु असल्याची टीकादेखील नितेश राणेंनी केली. तसेच टक्केवारी देणाऱ्या आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या पत्रातून नितेश राणे यांनी केलीय.

COMMENTS