Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंना फक्त पैशांशीच घेणे देणे

अपात्रता निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे बॅकफुटवर जातांना दिसून येत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये जल्लोषाचे वातवरण द

अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
मुंबईची तुंबई झाल्यास अधिकार्‍यांवर कारवाई

मुंबई ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे बॅकफुटवर जातांना दिसून येत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये जल्लोषाचे वातवरण दिसून येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना मागितली, पण त्यांनी स्वतचे नाव पुढे केले, यावरून लक्षात आले, त्यांना काय हवे होते ते. शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी मागण्याचे पाप देखील त्यांनी केले. त्यांना फक्त पैशांशीच घेणेदेणे’ अहे, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली.
निकाल जाहीर झल्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, कालपासून जल्लोष सुरू आहे. एक आनंद झाला आहे, अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे काल या निर्णयाने दाखवून दिले. ते म्हणाले, ’’मेरिट प्रमाणे निकेल लागावा, लोकशाहीमध्ये बहुमताच्या महत्त्व असते. आमच्याकडे विधानसभेत आणि लोकसभेत बहुमत आहेत. भरत गोगावले हे मुख्य व्हीप, शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. समोरच्या लोकांनी खोटे कागदपत्र दिल्याचे निकालात म्हंटले आहे. ठाकरे गटावर निशाणा साधत शिंदे म्हणाले, बहुमत असल्याचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत. बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केलेला, पण त्यांना यांनी मांडीवर घेतले, बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिली. ते म्हणेल, अध्यक्षांनी निर्णय देताना खरी शिवसेना आमची असून भरत गोगावले हे व्हीप म्हणून मान्यता दिली. पण अपात्र केले नाही, यामागे काय कारण हे आम्हाला माहीत नाही, त्यांनी अपत्रतेचा निर्णय द्यायला हवा होता, समोरच्या लोकांचे आरोप झाल्याने, कालचा निकाल जो दिलाय तो आम्ही देखील लीगल टीम सोबत चर्चा करू आणि पुढचा निर्णय घेऊ. ते म्हणेल, अध्यक्षांनी निर्णय देताना खरी शिवसेना आमची असून भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी अपत्रतेचा निर्णय द्यायला हवा होता, समोरच्या लोकांचे आरोप झाल्याने, कालचा निकाल जो दिला तो आम्ही देखील लीगल टीमसोबत चर्चा करू आणि पुढचा निर्णय घेऊ.

COMMENTS