Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणकडून 15 लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा आदेश

मुंबई / प्रतिनिधी : महावितरणकडून दरवर्षी सुमारे 8 ते 9 लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. सोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलणे आदी

बारावीतील विद्यार्थ्याची वाघोली येथे आत्महत्या
पालखी सोहळा 28 जून ते 4 जुलै सातारा जिल्ह्यात येणार
विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

मुंबई / प्रतिनिधी : महावितरणकडून दरवर्षी सुमारे 8 ते 9 लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. सोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलणे आदींसाठी महावितरणला दरमहा 2 लाख मीटरची आवश्यकता भासते. सद्यस्थितीत 22 एप्रिलपर्यंत महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 1 लाख 31 हजार 802 मीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबर 2022 पर्यंत तब्बल 15 लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 30 एप्रिलपर्यंत एक लाख आणि मे महिन्यात दोन लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात 3 लाख 27 हजार 500 मीटर उपलब्ध होत जाणार आहेत.
या व्यतिरिक्त 10 लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. 1.50 लाख थ्रीफेज मिटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या थ्रीफेज मिटरचा पुरवठा येत्या मे अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता आणखी 20 लाख सिंगल फेज मिटर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाय वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत वीजजोडणी दिलेल्या कृषीग्राहकांना प्रिपेड मिटर बसविण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. कृषि ग्राहकांना दिड लाख प्रिपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यत पूर्ण करण्यात येणार आहेत.

COMMENTS