खासदार किर्तीकर, अमेय घोले शिंदे गटाच्या वाटेवर ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार किर्तीकर, अमेय घोले शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई/प्रतिनिधी : शिवसेनेला बसणारे धक्के अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतांनाच, शिवसेनेचे खासद

नसरीन इनामदार यांना नेशन्स बिल्डर अवार्ड’ प्रदान
संस्थांनी बोगस भरती करून केली शासनाची फसवणूक
लग्नाच्या आमिषाने कॉन्स्टेबलचा तरुणीवर बलात्कार | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी : शिवसेनेला बसणारे धक्के अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतांनाच, शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि अमेय घोले शिंदे गटाची वाट धरणार असल्याचे चित्र आहे. दोघांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे दोघेही शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता आहे.
गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर, अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केल्याने ही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे घोले यांनी स्पष्ट केले आहे. गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यास शिवसेनेला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे. गजानन किर्तीकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते. त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. त्याशिवाय, गजानन किर्तीकर हे जुन्या पिढीतील शिवसैनिक आहेत. तेदेखील शिंदे यांच्यासोबत गेल्यास जुन्या शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ शकते. किर्तीकर हे पक्षाच्या नेतेपदी असल्याने शिवसेना कार्यकारणीत फूट पडली असल्याचे समोर येईल. त्याचा फायदा शिंदे गटाला निवडणूक आयोगासमोरील आपलाच पक्ष खरा असल्याचे सिद्ध करण्यास होऊ शकतो, असे जाणकार सांगतात. अमेय घोले हे मुंबईतील वडाळा भागातील नगरसेवक आहेत. अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. युवा सेनेच्या कोअर टीममध्येदेखील घोले यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कात घोले असल्याची चर्चा सुरू आहे.

COMMENTS