Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घसरणार : सचिन झगडे

श्रीगोंदा शहर : निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये नाशिक शिक्षक मतदार संघ व मुंबई शिक्षक मतदार सं

महापौरपदासाठी शिवसेनेच्या शेंडगे रिंगणात दाखल ; उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा आज अर्ज येणार
Ahnedmagar : नगरकरांनो कोरोनाची लस न घेणाऱ्यांना रेशनही मिळणार नाही | LokNews24
पंढरपूर पोलिसांनी 46 मोटार सायकली चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंदl पहा LokNews24

श्रीगोंदा शहर : निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये नाशिक शिक्षक मतदार संघ व मुंबई शिक्षक मतदार संघ तसेच मुंबई पदवीधर मतदार संघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघ या चार निवडणुका विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणुका संदर्भात चर्चा करत असताना महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिन झगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सदर निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांच्या सोबत असल्यामुळे उमेदवारांना तसेच मतदारांना अडचणीच्या ठरणार आहेत. सदर निवडणुका सुट्टीच्या कालावधीत आल्यामुळे तसेच मतदार संघाचा विस्तार पाहता पाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेड्यांमध्ये विखुरलेल्या सर्वसामान्य मतदारापर्यंत उमेदवारांना पोचणे अशक्यप्राय आहे.  शिक्षक मतदारसंघातील मतदार शिक्षक हे सुट्ट्यांच्या निमित्ताने आपापल्या शेकडो किलोमीटर दूरवर असलेल्या मूळ गावी परतलेले आहेत. शाळा 15 जून पासून सुरू होणार आहेत त्यामुळे त्यापूर्वी 10 जून रोजी मतदानासाठी येणे सर्वांनाच शक्य होणार नाही.परिणामी मतदानाची टक्केवारी प्रचंड खालावली जाण्याची शक्यता आहे. या सर्वांचा निवडणूक आयोगाने विचार केलेला नाही. तरी यासंदर्भात संघटना स्तरावर व न्यायालयीन स्तरावर विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिन झगडे यांनी व्यक्त केले.

COMMENTS