Homeताज्या बातम्यामनोरंजन

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा; अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. हृदक्रिया बंद पडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या म

बिग बॉस फेम अब्दू रोझिक ला ईडीचं समन्स
समस्येचे नशीब
खंडणी मागणार्‍याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करा ; व्यावसायिकांची मागणी

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. हृदक्रिया बंद पडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. चित्रपट दिग्दर्शक आनंद रवी यांनी पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने तेलुगु चित्रपट सृष्टीवर शोककळी पसरली आहे. आनंद रवी यांनी सोशल मीडियाद्वारे अल्लू रमेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अल्लू रमेश यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “पहिल्या दिवसापासूनच तुम्ही मला पाठिंबा दिला. मला अजूनही तुमचा आवाज ऐकू येतोय. तुमच्या निधनामुळे रमेश गुरू यांना धक्का बसला आहे. तुम्ही माझ्यासारख्या अनेक लोकांच्या हृदयात आहात…मिस यू ओम शांती,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे

COMMENTS