Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव येथे जावयाकडून सासू सासरे व पत्नीस बेदम मारहाण

अहमदनगर : एमआयडीसी येथे देवी दर्शनाकरिता एवढ्या लांब जाण्याऐवजी येथेच केडगावला देवी दर्शनाला जा असे म्हटल्याचा राग आल्याने एकाने पत्नीस व सासूस ब

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती आंदोलन
भारनियमनात दिलासा…अतिरिक्त वीज उपलब्ध
समता तिरंगा रॅली हा उपक्रम अमृत महोत्सवानिमित कोपरगावात संपन्न झालेल्या उपक्रमांपैकी एक उपक्रम.

अहमदनगर : एमआयडीसी येथे देवी दर्शनाकरिता एवढ्या लांब जाण्याऐवजी येथेच केडगावला देवी दर्शनाला जा असे म्हटल्याचा राग आल्याने एकाने पत्नीस व सासूस बेदम मारहाण केली. ही घटना केडगाव येथील भुषणनगर मधील गणपती मंदीराजवळ घडली. याबाबतची माहिती अशी आहे की एकनाथ जयसिंग पवार (वय 61 वर्षे रा.गणपती मंदीरा जवळ, भुषणनगर केडगाव अहमदनगर) यांचे जावई गणेश सोपान गवळी मुळ (रा.गणेश निवास नागापुर एमआयडीसी अ.नगर) हे कामावरुन आले व मुलीला म्हणाले की, आपल्याला एमआयडीसी येथे देवीला जायचे आहे. त्यावेळी एकनाथ पवार त्यांना म्हणाले की, एमआयडीसी येथे लांब जाण्याऐवजी तुम्ही इथेच केडगाव देवीला जाऊन या असे म्हणल्याच्या कारणावरुन जावई यांना राग आल्याने त्याने मोठमोठयाने शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांची मुलगी तिच्या पतीस समजावून सांगत असताना जावई गणेश गवळी याने मुलीला व पवार यांच्या पत्नीला लाथाबुक्यांनी मारहाण केली  त्यावेळी पवार त्यास सोडवत असताना त्याने जवळच पडलेला बांबुचा लाकडी दांडा उचलुन त्यांच्या उजव्या हाताचे मनगटावर मारुन जखमी केले आहे.व  म्हणाला की, तुम्ही माझे नादी लागु नको नाहीतर मी जिवे ठार मारून टाकीन असे म्हणुन घरातुन निघुन गेला.  याप्रकरणी या कोतवाली पोलिसांनी एकनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली.पुढील तपास पोलिस हवालदार आर आर औटी, हे करीत आहेत.

COMMENTS