Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 13 हजार बँक खात्यांतून पैसे गायब

रिझर्व्ह बँकेने केली धक्कादायक आकडेवारी जाहीर

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन माध्यमांतून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मात्र त्याचबरोबर बॅकिंग क्षेत्रात मोठ्या

दूध विक्रेत्याला हॉर्न वाजवणे पडले महागात, तिघांकडून बेदम मारहाण
साताऱ्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार 
चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान अगाध ,मुश्रीफांचा खोचक टोला | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन माध्यमांतून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मात्र त्याचबरोबर बॅकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 13 हजार 530 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यात गुंतवलेली रक्कम जवळपास निम्मी होवून 30 हजार 252 कोटी रुपयांवर आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालात डिजिटल पेमेंटद्वारे सर्वाधिक फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. कार्ड-इंटरनेटमधून फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली. कर्जाच्या पोर्टफोलिओ बाबतीतही फसवणूक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 2021-22 मध्ये एकूण 9,097 फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये 59,819 कोटींचा समावेश होता. तर 2020-21 मध्ये 1,32,389 कोटी रुपयांच्या फसवणुकीची 7,338 प्रकरणे समोर आली आहेत. असे आरबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तीन वर्षात नोंदवलेल्या 1 लाख आणि त्याहून अधिकच्या फसवणुकीच्या संदर्भात, ठइख डेटा 2020-21 च्या तुलनेत 2021-22 मध्ये एकूण फसवणुकीच्या रकमेत 55 टक्के घट झाली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, खाजगी क्षेत्रातील बँकांद्वारे नोंदवलेल्या फसवणुकीच्या संख्येत कार्ड-इंटरनेट इत्यादीसारख्या छोट्या किंमतीची फसवणूक अधिक आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्जाशी संबंधित फसवणुकीची प्रकरणे अधिक आहेत. मध्यवर्ती बँकेने असेही निदर्शनास आणून दिले की 2021-22 आणि 2022-23 दरम्यान नोंदवलेल्या फसवणुकीच्या विश्‍लेषणावरून असे दिसून येते की फसवणूक झाल्याची तारीख आणि तपास यात बरेच अंतर आहे. 2022-23 दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 21,125 कोटी रुपयांची 3,405 फसवणूक केली आहे. खाजगी बँकांनी 8,932 प्रकरणे नोंदवली आहेत ज्यात 8,727 कोटी रुपयांचा समावेश आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एकूण 30,252 कोटी रुपयांपैकी 95 टक्के किंवा 28,792 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणांची नोंद झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

फसवणुकीच्या प्रकारात वाढ- आरबीआयच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, व्हॉल्यूमच्या बाबतीत, फसवणूक प्रामुख्याने डिजिटल पेमेंट्स (कार्ड/इंटरनेट) च्या श्रेणीमध्ये झाली. मूल्याच्या संदर्भात, जास्तीत जास्त फसवणूक मुख्यत्वे लोन पोर्टफोलिओ (अ‍ॅडव्हान्स श्रेणी) मध्ये नोंदवली गेली. वार्षिक अहवालानुसार, 2021-22 मध्ये एकूण 9,097 फसवणूक प्रकरणे उघडकीस आली, ज्यात 59,819 कोटी रुपयांचा समावेश आहे. यापूर्वी, 2020-21 मध्ये 7,338 फसवणूक प्रकरणांमध्ये गुंतलेली एकूण रक्कम 1,32,389 कोटी रुपये होती.

COMMENTS