Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर 53 वर्षानंतर निळवंडे पूर्णत्वास

प्रकल्पांसाठी निधी कमी पडू देणार नाही ः मुख्यमंत्री शिंदे

अहमदनगर/प्रतिनिधी ः राज्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी यापुढे निधी कमी पडणार नाही, कारण मी सांगतो आणि ते तिजोरी उघडतात असे वक्तव्य मुख्यमंत्री एकना

प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडेंची मनमानी ?
सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा : उपमुख्यमंत्री पवार
लेकीसह आई-वडिलांचा अपघातात मृत्यू | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः राज्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी यापुढे निधी कमी पडणार नाही, कारण मी सांगतो आणि ते तिजोरी उघडतात असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केले. निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, माजी मंत्री मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, निळवंडेसाठी 53 वर्षे वाटं पाहावी लागली. प्रकल्पाबाबत अनेक चढ-उतार आले. झाले गेले गंगेला वाहिले आता स्वच्छ पाणी येणार. मी शेतकर्‍यांचा मुलगा हे काही लोकांना सहन होत नाही. मी शेतकर्‍याचा मुलगा दिवस रात्र काम करतो. अनेक सूचनांचा आदर करणार हे सरकार आहे. आमचे मंत्रमंडळदेखील दिवस रात्र काम करतात. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. कुणालाही मोबदल्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. काल कॅबिनेट मंत्रीमंडळात शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहे. हे सरकार अनेक प्रकल्प मार्गी लावत आहे. प्रत्येक गोष्टीला सरकार प्राधान्य देत आहे. यापुढे कोणत्याही कामाला निधी कमी पडणार नाही. कारण मी फक्त सांगतो आणि ते तिजोरी खोलतात. पहिल्या दिवसांपासून आम्ही सामान्यांसाठी काम केलं आहे. सरकारचे सर्व निर्णय हे शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत. मविआ सरकारच्या काळात फक्त एका प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. शेतकर्‍यांच्या आयुष्यांत चांगले दिवस येणार. आजदा दिवस हा शेतकर्‍यांसाठी आनंदाचा आहे. 32 गावातील पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार.

माझ्या जन्माच्या आधीपासून प्रकल्पाला सुरूवात ः फडणवीस – निळवंडे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी तब्बल 53 वर्षांचा कालावधी उलटला असून, यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या जन्माच्या आधीपासून प्रकल्पाला सुरूवात झाल्याचा टोला लगावला. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची चाचणी वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हात आगामी काळात 235 गावं जलयुक्त करण्याचे काम चालू असल्याचेही सांगितले आहे. तर शिंदे सरकारने 11 महिन्यात 27 प्रकल्पांना निधी दिल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच आता शेतकर्‍यांना एक रूपयात पीकविमा देण्याची पद्धत बदलण्यात येणार आहे. तर मविआवर टीका करताना म्हणाले की, आपण मागील वर्षी एक सरकार पाहिले ज्या सरकारला निर्णय लकवा होता, निर्णय घ्यायचा नाही हाच मोठा निर्णय त्यांचा होता, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

113 गावांतील पाणी प्रश्‍न मिटणार – निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. यात डावा कालवा हा 85 किलोमीटरचा असून यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर मधील सहा गावे असे एकूण 113 गावांमधील पाणी प्रश्‍न मिटणार आहे. तर उजवा कालवा हा 97 किलोमीटरचा असून यामुळे 69 गावांमधील क्षेत्र सिंचन क्षेत्राखाली येणार आहे.

COMMENTS