दूध विक्रेत्याला हॉर्न वाजवणे पडले महागात, तिघांकडून बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध विक्रेत्याला हॉर्न वाजवणे पडले महागात, तिघांकडून बेदम मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी ः हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून तिघांकडून दूध विक्रेत्यास मारहाण झाली. रस्त्याने पुढे चाललेल्या ऑटो रिक्षाने साईड न दिल्याने येणार्

बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात 15 भरारी पथके
*VIRAL सत्य की असत्य : 5G टॉवरसाठी देशात Corona आणि Lockdown चे नाटक ? काय आहे सरकारची खेळी ? | LokNews24*
दुकान फोडून लंपास केलेले साडेचार लाखांचे २३ मोबाईल पोलिसांनी दिले दुकानदाराला परत

अहमदनगर/प्रतिनिधी ः हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून तिघांकडून दूध विक्रेत्यास मारहाण झाली. रस्त्याने पुढे चाललेल्या ऑटो रिक्षाने साईड न दिल्याने येणार्‍या दूध विक्रेत्याने दोन-तीन वेळा हॉर्न वाजवला याचा राग येऊन रिक्षा चालक व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. ही घटना माळीवाडा बस स्थानकाजवळ घडली. याबाबतची माहिती अशी की, अमोल विलास जाधव (वय 21 वर्षे, रा. जाधव मळा, दौण्ड रोड, शितल हॉटेल मागे, बुरुडगाव, अहमदनगर) हे फुलसौंदर चौकातील लक्ष्मी हॉटेलचे मालक संजय जंजाळे यांना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दूध देऊन घरी जात असताना त्यांच्यासमोर एक रिक्षा चालत होती (नंबर माहीत नाही). तेव्हा जाधव यांनी पुढे जाण्याकरिता त्याला हॉर्न दिला, परंतु त्याने जाधव यांना पुढे जाण्यासाठी वाट दिली नाही म्हणून त्यांनी त्याला दोन ते तीन वेळा हॉर्न दिला तरी त्याने पुढे जाण्यासाठी वाट दिली नाही म्हणून जाधव यांनी त्यांची मोटारसायकलवर (क्रमांक एमएच 16 एएस 6928) रिक्षाच्या मागे मागे चालत होते. अचानक त्या रिक्षा चालकाने त्याची रिक्षा थांबवून जाधव यांनाही थांबवले व त्या रिक्षा मधून तीनजण उतरले व त्यांनी जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. मारहाण करणार्‍या पैकी एकाने जाधव यांचा दुधाचा कॅन घेवून त्यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे जाधव जमिनीवर खाली पडले व त्यानंतर ते लोक तेथून निघून गेले. त्यानंतर जाधव यांनी मोठा भाऊ नितीन जाधव याला फोन करून त्या ठिकाणी बोलविले. भाऊ आल्यानंतर दोघांनी मारहाण करणार्‍या लोकांबद्दल तेथे उभे असलेले रिक्षा चालकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तुझ्या डोक्यात दुधाचा कॅन मारणार्‍याचे नाव रवि कर्डक असून दुसर्‍याचे नाव प्रकाश विधाते आहे व तिसर्‍याचे नाव माहिती नाही. यावरुन कोतवाली पोलिसांनी जाधव यांच्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे.

COMMENTS