Homeताज्या बातम्यासंपादकीय

पंतप्रधान मोदी आणि मराठा राज्यकर्ते ! 

कालच छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती महाराष्ट्रासह देशात साजरी झाली. महाराज स्वराज्य संस्थापक झाले. महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील मावळे

अनपेक्षित निकाल, पण इंडिया आघाडीला फायद्याचा!
श्रमाचे सौंदर्यशास्त्र गाणारा कवी ! 
जनतेचा प्रभाव आणि दबाव ! 

कालच छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती महाराष्ट्रासह देशात साजरी झाली. महाराज स्वराज्य संस्थापक झाले. महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांचा ज्वाजल्य इतिहास हा संशोधन आणि अभ्यासाचा विषय जगासाठी बनला. परंतु, त्यांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रात गेल्या ७० वर्षात एकमेव समाज समुदाय सत्ता उपभोगत आलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानातील लहान जातींना आपल्या सोबत स्वराज्य स्थापन केले. त्यांना सत्तेत मिळणारा लाभही त्याला त्यातूनच रयतेला शेतजमिनी मिळाल्या. आधुनिक लोकशाहीचा काळ. या काळात ज्याची जेवढी संख्या असेल तेवढी भागिदारी देणं महत्त्वाचं असताना, महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्त्यांनी वारसा छत्रपतींचा सांगितला आणि कृती मात्र जुलमी राजसत्तेची केली. सत्ता ही आपली खाजगी जहांगिरी मानणाऱ्यांनी आपल्या तुंबड्या भरण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविला. साऱ्या बहुजन समाजाला वाऱ्यावर सोडून सत्ता आणि सत्तेतून मिळणारा मलिदा आपल्या घरात डांबत राहिले. सत्तेच्या धुंदीत ते विसरली की, सत्ता ही चंचल सुंदरी असते. आज तुमच्याकडे असेल तर उद्या ती इतरांकडे असेल! सत्तारूपी चंचल सुंदरी त्यांना महाराष्ट्रात १९९५ पासून चकवा द्यायला लागली होती. पण, सत्तेच्या धुंदीत त्यांना वास्तवाचे भान येईना. सत्तेतला पक्ष बदलला की, सत्तेवर आलेल्या पक्षाची वाट धरायची, हा सोपा उपाय त्यांनी अवलंबला. ज्या लोकांच्या मतांवर सत्ताधीश झालो, याची त्यांनी कधी पर्वा केली नाही! एवढेच नव्हे, तर, आपल्याच मराठा बांधवांना देखील त्यांनी गरीब होईपर्यंत लक्ष घातले नाही; परिणामी, आज गरीब मराठा बांधवांवर आरक्षण मागण्याची पाळी आली. अर्थात, त्यांच्या आरक्षणाला एससी, एसटी, ओबीसी यांचा विरोध नाही! मात्र, त्यांनी स्वतंत्र आरक्षण घ्यावं, हे या समुदायांचे म्हणणे आहे. असो. 

    महाराष्ट्र राज्याची दीर्घकाळ सत्ता उपभोगून आज महाराष्ट्र प्रश्नांनी ग्रस्त झाला याचा दोष द्यायचा कुणाला? सत्तर वर्षे सलग सत्तेत राहून महाराष्ट्राचा समुळ कायापालट करण्याची जबाबदारी न पेलू शकलेले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्रयाला जाऊन आपला बचाव करण्यात गुंतले आहेत. राज्याच्या सत्तेत दीर्घकाळ राहिल्यानंतर या राजकारणात बाहेर आलेले सत्य म्हणजे वाट्टेल त्या पध्दतीने मलिदा लाटल्याचे वास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उघड होत आहे. खरेतर, पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना कारवाई ला सामोरे जाण्यापासून केवळ रोखले नाही; तर, त्यांना मानाची पदे दिली. पुरू आणि सिकंदर राजांच्या लढाईत पराभूत झालेल्या सिकंदर राजाला जेव्हा विचारण्यात आले की, तुझ्या बरोबर काय करायला हवे? तेव्हा, सिकंदर उत्तरला एका राजाने दुसऱ्या राजाशी जो व्यवहार करायला हवा, तसे करायला हवे. इतिहासातील ही राजनिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरल्यामुळे मराठा राज्यकर्ते सन्मानाने वागवले जात आहेत. त्यांच्या या सन्मानाचे श्रेय नरेंद्र मोदी यांच्या संस्कारक्षम राजकारणाला द्यावे लागेल!  वैराने वैर वाढते, प्रेमाने जग जिंकता येते; हे तत्व मोदी साहेब चांगले जाणतात. त्यांच्या या जाणत्या राजकारणाने रयतेवर अन्याय करणाऱ्या या राज्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर निर्माण झालेले प्रश्न ही मराठा राज्यकर्त्यांची देणं आहे. परंतु, ते सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान यांनी जबाबदारी घेतली आहे. पंतप्रधान यांनी दुसऱ्यांनी केलेल्या चुकांना दुरूस्त करण्याची घेतलेली जबाबदारी ही खरेच मोठी आहे. या कामात त्यांना नक्की यश येईल; कारण, बहुजन समाजाचा मोठा वर्ग आज पंतप्रधानांसोबत आहे. 

COMMENTS