Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक होणार? शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

सांगली / प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट मागील एप्

कापूसखेड मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट
ढाकणी येथे अज्ञात बोलेरोच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

सांगली / प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट मागील एप्रिल महिन्यात काढण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. राज ठाकरे यांना एका जुन्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र वारंट सन 2008 मध्ये कोकरूड पोलिस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड विधान 109, 117, 143, आणि मुंबई पोलिस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज यांच्या विरोधातील हा गुन्हा जुना असून सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सन 2008 मध्ये राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. यावेळी त्यांना मुंबई येथे अटक झाल्याच्या कारणावरून मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी आकाराम सावंत, रामचंद्र आनंदा सावंत, अनिल भगवान सावंत, हरिष वसंत सावंत (सर्व रा. सावंतवाडी, ता. शिराळा) व संजय पांडुरंग पाटील (रा. काळुंद्रे, ता. शिराळा), दत्तात्रय महादेव पाटील (रा. शिराळा), प्रताप हिंदुराव कदम (रा. शिराळा) सचिन भिमराव पाटील (रा. अंत्री बुद्रुक, ता. शिराळा) यांनी यावेळी शिराळा तालुक्यात शेडगेवाडी फाटा (ता. शिराळा) येथे जमावबंदी असताना देखील बेकायदा जमाव व दहशत निर्माण करून दबावतंत्र वापरून काही दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला होता. राज ठाकरे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, राज ठाकरे जिंदाबाद, मनसे जिंदाबाद अशा चेतावणीखोर घोषणा देऊन दुकाने बंद करून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य केले होते. तानाजी सावंत यांच्यासह मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे मनसे सरचिटणीस शिरिष पारकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सध्या या गुन्हाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कोर्टाने या प्रकरणी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना राज ठाकरे यांना कोर्टात अटक करून हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. हे वॉरंट काढण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांकडून कारवाई झाली नाही. या प्रकरणी शिराळा प्रथम वर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुनावणीच्या तारखांना कोर्टात हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

COMMENTS