गुणवत्ता हीच भविष्याची खरी श्रीमंती होय : डॉ. बाबुराव उपाध्ये

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुणवत्ता हीच भविष्याची खरी श्रीमंती होय : डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर/वार्ताहर : शिक्षण म्हणजे प्रकाशाचा मार्ग असून त्यातील गुणवत्ता ही भविष्यकाळातील खरी आणि अमृतमय श्रीमंती असते असे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठ

शिरसगावमध्ये महात्मा बसवेश्‍वर व कर्मवीरांना अभिवादन
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यास पाच दिवसाची पोलीस कोठडी
“सेवा ही संघटन या विचाराने कोपरगाव मतदारसंघात भाजपाने साजरा केला ७ वा वर्षपूर्ती दिवस”

श्रीरामपूर/वार्ताहर : शिक्षण म्हणजे प्रकाशाचा मार्ग असून त्यातील गुणवत्ता ही भविष्यकाळातील खरी आणि अमृतमय श्रीमंती असते असे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील अड, रावसाहेब शिंदे शैक्षणिक संकुलाच्या सभागृहामध्ये ज्यूनिअर कॉलेज विद्यानिकेतन टॅलेंट सर्चचे यशस्वी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते,प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, प्राचार्य विनोद रोहमारे, प्राचार्य सौ. रंजना जरे उपस्थित होते.वर्षा धामोरे यांनी स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. समनव्यक योगेश गायकवाड यांनी पीपीटी द्वारे 10वी नंतर कोणती शाखा निवडावी आणि गुणवत्ता कशी प्राप्त करावी यासंदर्भांने विस्तृत प्रास्ताविक केले.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, अड, रावसाहेब शिंदे यांनी शिक्षण आणि प्रामाणिक सेवाभाव यांना फार महत्व दिले, त्यांच्या आदर्श विचारातून विद्यानिकेतनचे शैक्षणिक संकुल कार्यरत आहे, श्रीमती शशिकलाताई शिंदे, डॉ. राजीव शिंदे, डॉ.प्रेरणा शिंदे, चेअरमन प्राचार्य तुळशीराम शेळके आणि पदाधिकारी, शिक्षक, सेवकवर्ग,पालक, विद्यार्थी यांच्या योगदान आणि प्रामाणिक सेवाभावातून हे संकुल प्रगतीपथावर आहे, त्याचाच प्रत्यय टॅलेंट सर्च गुणवत्तेतून येतो.असे सांगून आपल्या काळातील शिक्षण आणि आजचं शिक्षण यातील जमीन अस्मानाचे अंतर सांगितले, आज तंत्रज्ञान हाती आहे, आम्हाला शाळेतच जाणे कठीण होते, कुंभारवाड्यात शिक्षणाचा दिवाच नसल्याने आम्हाला कोणी शाळेचा रस्ता दाखविलाच नाही.शाळेत फुटका पाटीचा तुकडा चौथीपर्यंत जपला आणि फाटकी पुस्तके मिळाली तेव्हा वाचली, आम्हाला शिक्षण घेणे अवघड होते पण नोकरी मात्र लगेच मिळाली. आज शिक्षण घेणे सोपे झाले पण नोकरी मिळणे अवघड असल्याचे सांगून बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कोणत्याही शाखेची निवड करा पण टॉपवर रहा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. प्राचार्य शेळके यांनी आपल्या काळातील जीवन शिक्षण संघर्ष सांगितला. प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी आजचे कष्ट हे उद्याचे सुख असते, या शाळेचे आणि आपल्या परिवाराचे परिश्रम यांची आठवण ठेवा ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्राचार्य विनोद रोहमारे, प्राचार्य सौ. रंजना जरे, अमित जगताप, निखिल करपे, नितीन महाडिक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते, मान्यवरांच्या हस्तें बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. सूत्रसंचालन वर्षा धामोरे यांनी केले तर असराज म्हस्के यांनी आभार मानले.

COMMENTS