Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी : डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आवाहन

पुणे / प्रतिनिधी : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित

कालिकाईसह संपर्क अ‍ॅग्रोच्या कोट्यवधी फसवणूकप्रकरणी तीन संचालकांना अटक; सातारा अर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन
कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप

पुणे / प्रतिनिधी : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित ’दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष करून महिलांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले.
डॉ. गोर्‍हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन सर्व चित्रमय फलकांवरील माहिती जाणून घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी देशमुख, माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, पोलीस निरीक्षक अश्‍विनी सातपुते उपस्थित होते.
डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, कोरोना काळात शासनाने महत्वाचे निर्णय घेतले. डॉक्टर मंडळींचा टास्क फोर्स तयार करून वैद्यकीय सेव जलदगतीने देण्याचा प्रयत्न केला. कोरोना नियंत्रणासोबतच इतरही विकासकामे केली. तसेच नवनवीन योजना सुरू केल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या या प्रदर्शनात सर्व योजनांची माहिती मिळते. सचित्र माहिती असल्याने ती सर्वसामान्यांना अतिशय उपयुक्त अशी आहे. त्यामुळे गावागावातील नागरिक, महिला, युवकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनाला महिलांनी स्वतः भेट देत माहिती घ्यावी व इतर महिलांनाही समाज माध्यमातून आवाहन करावे. सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती घ्यावी. योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी राज्यातील जनतेला रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर शुभेच्छाही दिल्या. श्रीमती गोर्‍हे यांनी यावेळी 360 अंश सेल्फी घेतली. तत्पूर्वी डॉ. गोर्‍हे यांनी महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

COMMENTS