Homeताज्या बातम्यादेश

यंदा गहू उत्पादन वाढणार

नवी दिल्ली ः चालू पीक वर्षात केंद्र सरकारने अंदाज वर्तविल्यापेक्षा जास्त गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी आयुक्त पी. के. सिंग यांनी व्यक्त केल

मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; 24 कोकरांचा मृत्यू; 7 कोकरे जखमी; 4 कोकरे लंपास
मत्स्योत्पादनामध्ये देशात अव्वल राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता :  केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह
राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

नवी दिल्ली ः चालू पीक वर्षात केंद्र सरकारने अंदाज वर्तविल्यापेक्षा जास्त गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी आयुक्त पी. के. सिंग यांनी व्यक्त केला आहे. सरकारने चालूवर्षी 112.18 दशलक्ष टन इतके गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविलेला आहे. देशाच्या काही भागात यंदा अवकाळी पाऊस पडला. त्याचा परिणाम गव्हाच्या दर्जावर होणार असला तरी उत्पादनात मात्र घट होणार नाही, असे सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गत पीकवर्षात 109.59 दशलक्ष टन इतके गव्हाचे उत्पादन झाले होते.

COMMENTS