Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजे प्रतिष्ठानची लवकरच नवी कार्यकारिणी : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

सातारा / प्रतिनिधी : गेल्या 12-13 वर्षापासून राजे प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना, समाजामध्ये आमच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या सामाजिक संघटनेत नव

फलटणमध्ये पुण्याच्या व्यापार्‍याला भरदिवसा लुटले
सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस सोडण्याची मागणी
कोल्हापूरात तिसर्‍या लाटेत रुग्णसंख्या दीडपटीने वाढणार

सातारा / प्रतिनिधी : गेल्या 12-13 वर्षापासून राजे प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना, समाजामध्ये आमच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या सामाजिक संघटनेत नवीन तरुणांना संधी देण्याच्या उद्देशाने, राजे प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीमध्ये संघटनात्मक बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच समाजाचे हिताकरीता झटणार्‍या, राजे प्रतिष्ठानचे सेवा भावी आणी निस्वार्थी कार्यकर्त्यांची नवीन कार्यकरिणी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस सातारा येथून दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या पत्रकात पुढे नमुद करण्यात आले आहे की, समाजाच्या सुख-दुखःशी एकरुप होवून, कोणत्याही प्रकारे कोणावरही अन्याय होवू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार्‍या निस्वार्थी तरुणांची आणि अनुभवी व्यक्तींची संघटना म्हणून राजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, ही सामाजिक संघटना महाराष्टभर ओळखली आहे. आमच्या अधिपत्याखाली अनेक छोटे मोठे उपक्रम राजे प्रतिष्ठानच्या वतीने पश्‍चिम महाराष्ट्रात आणि राज्यात राबविले गेले आहेत. शासनाच्या धर्मादाय कार्यालयात विश्‍वस्त संस्था म्हणून नोंदणीकृत असलेली आमच्या अध्यक्षतेखालील ही सामाजिक संस्था, सामाजिक, शैक्षणिक, सार्वजनिक कार्यात आपला वाटा उचलण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. अनेकांना मदतीचा हात देताना, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा प्रामाणिक उद्देश या संघटनेच्या स्थापनेमागे आमचा राहीला आहे.
या संस्थेचे कार्य अधिक चांगल्या पदोसोपान संघटना पध्दतीद्वारे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचवण्यासाठी नुकताच प्रतिष्ठानच्या कार्याचा नियोजनात्मक आढावा नुकताच घेण्यात आला. त्यामध्ये अनेक विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजे प्रतिष्ठानच्या कार्यकारीणीवर समाजकार्य आणि सेवाकार्य करण्यासाठी नवीन चेहर्‍यांना संधी देण्याच्या उद्देशाने जुनी कार्यकारीणी बरखास्त करून, संघटनात्मक बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. राजे प्रतिष्ठानची कार्यकारीणीमधील बदल लवकरच करण्यात येणार आहेत. त्यानुसार नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS