मकरंद देशपांडे निशिकांत पाटील सुरेश हाळवणकर भाजप कोअर कमिटीच्या निर्णयाकडे लक्ष; इस्लामपूर विधानसभा मतदार संघात उत्सुकता शिगेलाइस्लामपूर / हिंम
भाजप कोअर कमिटीच्या निर्णयाकडे लक्ष; इस्लामपूर विधानसभा मतदार संघात उत्सुकता शिगेला
इस्लामपूर / हिंम्मत कुंभार : विधान परिषदेच्या दहा जागासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपा पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते. याची उत्सुकता भाजपा पदाधिकार्यांना लागली आहे. भाजपाचे संख्याबळ पाहता चार आमदार विधान परिषदेत जाऊ शकतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून एका जागेसाठी भाजपाचे समन्वयक मकरंद देशपांडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सुरेश हाळवणकर, सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नावाची भाजपाकडून प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. निशिकांत पाटील यांचा राजकीय संघर्ष पाहता विधान परिषदेवर त्यांना संधी मिळाली तर जयंत पाटील यांचे राजकीय आक्रमण थोपविण्यास मदत होईल. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे.
पश्चिम महाराष्ट्र भाजपा समन्वयक मकरंद देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातून विधान परिषदेवर एक सदस्य देण्याची शक्यता आहे. विधानसभा व विधान परिषदेच्या यादीमध्ये मकरंद देशपांडे हे नाव पहिल्यांदा असते. मात्र, नंतर पहिल्या नावावर लाल फुली मारली जाते. आम्ही आमच्या मतदार संघात काम करत आहोत. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य करावा लागतो. भाजपाचे काम करण्यात आम्ही समाधानी आहोत. भाजपामध्ये अनेक मातब्बर नेत्यांनी प्रवेश केला आहे. प्रत्येकाला आपला मतदारसंघ निवडणुकीसाठी आहे. त्यामुळे भाजपामधील इच्छुकांनी आतापासून मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, भाजपा पक्ष हा देशहिताला प्राधान्य व कर्तबगार नेतृत्वाला संधी देणारा पक्ष आहे. भाजपा पक्षात वारसांना संधी दिली जात नाही. भाजपाची ध्येय धोरणे इतर राजकीय पक्षाप्रमाणे नाहीत. पक्षातील अनेक पदाधिकारी कर्तबगार आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षाचे मोठे संघटन केले आहे. याची नोंद भाजपा वरीष्ठ पातळीवर वेळोवेळी घेतली आहे. आमचा संघर्ष हा प्रस्थापित, अविचारी, व्देषाने राजकारण करणार्या नेतृत्वा विरोधात आहे. माझ्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांना विरोधकांच्या व प्रशासन अधिकार्यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, मी व भाजपाचा कार्यकर्ता असल्या कुचक्या राजकारणाला डगमगणार नाही. विधान परीषदेवर संधी मिळाली तर खर्या अर्थाने या मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. भविष्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. संधी मिळाली तर सोने करु, भाजपा पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करुन पुढे अधिक जोमाने भाजपाचे काम अखंडपणे सुरु राहणार आहे.
एकंदरीत मंत्री जयंत पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला सुरुंग लावण्याचे काम भाजपाचे निशिकांत पाटील, विक्रम पाटील, राहुल महाडीक यांनी केले आहे. इस्लामपूर मतदार संघातील भाजपाला ताकद देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे नाव अग्रेसर असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह संपुर्ण महाराष्ट्र निशिकांत पाटील यांचा राजकीय संघर्ष पाहत आहे. त्यामुळे भाजपा कोअर कमिटीकडून हाळवणकर, देशपांडे का पाटील यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहीले आहे.
विधान परिषद निवडणूकित माझे नाव अग्रेसर असल्याची मला कल्पना नाही. काल मी व प्रदेशाध्यक्ष सोबत होतो. त्यांनी ही मला विधान परिषदेबद्दल काहीही सांगितले नाही. पक्ष देईल तो निर्णय मान्य करू.
माजी आ. सुरेश हाळवणकर (भाजपा प्रदेश उपाध्यक्ष)
COMMENTS