Homeताज्या बातम्या

राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

बीड : राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यालय, बीड येथे इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल

मुप्टा बीड जिल्हा वतीने गुणवंत विद्यार्थी चि. अभिवादन जावळे यांचा गौरव
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात गुणवंतांचा  गौरव
कुंभार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारआदर्श शिक्षक व नवनियुक्त पोलीस पाटलांचाही गौरव


बीड : राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यालय, बीड येथे इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री. पी. एन. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय, बीडचे मुख्याध्यापक श्री. ए. आय. पाटील उपस्थित होते. मान्यवर व पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षांचे स्वागत श्री. व्ही. पी. जाधव यांनी, तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. ए. एन. पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्ही. पी. जाधव यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. आर्या बरकसे, कु. गौरी भुरे आणि कु. गायत्री धुताडमल यांनी मनोगत व्यक्त करत विद्यालयाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पालक प्रतिनिधी श्री. अशोक धुताडमल यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे श्री. ए. आय. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातही परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर यशाची परंपरा कायम राखावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्री. पी. एन. पाटील यांनी बदलत्या परीक्षा पद्धतीचा अभ्यास करून नियोजनबद्ध तयारी करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणार्‍या कु. आर्या दत्तात्रय बरकसे हिला मानाचा मुकुट, शोल्डर सॅश, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच दहावी व बारावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शोल्डर सॅश, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रियदर्शनी ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. सिराजोद्दीन देशमुख, सचिव मा. श्री. सुभाषचंद्रजी सारडा तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधीसभा सदस्या डॉ. आदिती सारडा यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती ए. के. वाघमारे यांनी केले. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS