सत्ता स्थापनेसाठी जोर-बैठका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता स्थापनेसाठी जोर-बैठका

एकनाथ शिंदे गटाची मान्यतेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धावमुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला निर्णायक वळण ला

स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!
त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घुसखोरी प्रकरणी एसआयटी चौकशी
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा गोळीबार

एकनाथ शिंदे गटाची मान्यतेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला निर्णायक वळण लागलं आहे. महाविकास आघाडी सरकार हटवून नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. सध्या सुरू असलेल्या वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्यात सध्यातरी भाजप आणि शिंदे गट सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. मात्र महाविकास आघाडी सध्या तांत्रिक मुद्दे उपस्थित करून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार येऊ नये, यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. शिवसेनेने काल 12 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर आणखी 5 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी सेना करणार आहे. त्यामुळे जर 17 आमदार निलंबित झाले तर, फ्लोटर टेस्टला सामौरे जातांना महाविकास आघाडीला सोपे जाईल. मात्र आघाडीच्या या रणनीतीला छेद देण्यासाठी भाजप देखील मैदानात सरसावली असून, सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोर-बैठका मोठया प्रमाणावर सुरु आहे. दीर्घकाळ टिकू शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील शिंदे गटाने केलेले बंड आता रंगत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे 37 आमदार आणि 9 अपक्षांसह गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. शिवसेनेच्या 37 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवून त्यांनी महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवळ, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना आपण आता शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते असल्याचे सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाल्याची माहितीही दिली आहे. सुनील प्रभू हे यापूर्वी या पदावर कार्यरत होते.
दरम्यान, शिंदेगटात सामील होऊन गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे आमदार परत येत नाहीत. तोवर महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आहे. अश्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सध्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी या बंडखोर आमदारांना फोन केलाय. यांच्याकडून आमदारांच्या पत्नींना फोन केला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या पत्नींना फोन करुन रश्मी ठाकरे यांच्याकडून भावनिक साद घातली आहे. आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटले आहे. सध्या मविआ सरकार वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आमदार फुटणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्‍न असल्याचं म्हणणारे शरद पवारदेखील आता सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शिवाय रश्मी ठाकरे यांनीदेखील अ‍ॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांनी एक आवाहन केले आहे.

सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात
सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. मातोश्रीवर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सायंकाळी महत्वाची बैठक झाली असून, भाजप-शिंदे गटाचे सत्तांतर लांबणीवर कसे टाकता येईल, आणि या वेळेत शिंदे गटातील आमदार आपल्याकडे कसे आणता येईल, यावर मोठी चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातील तरतूदींचा आधार घेत, तांत्रिक मुद्दे उपस्थित करून शरद पवार शिंदे गटाचे बंड मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जर बंडखोर आमदारांचे निलंबन केले आणि फ्लोर टेस्ट केली, तर बहुमताचा आकडा कमी होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहिल, असा पवारांचा होरा आहे.

शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरीच
शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींचीच नियुक्तीला उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या कार्यलयाकडून जारी केलेल्या एका पत्राद्वारे अजय चौधरींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटाला हा मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी अर्थात विधीमंडळाच्या पक्ष नेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला धोका निर्माण झाला आहे. शिंदे गटातील 16 आमदारांचे निलंबन करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

बंडखोर आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल : मुख्यमंत्री ठाकरे
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. त्याला आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दुजोरा दिली आहे. हे सर्व भाजपनेच केले, या आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल, असे म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपसोबत हात मिळवणी करावी अशी मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी इच्छा आहे. तसे ते उघडपणे बोलतही आहेत. शिंदे गटाच्या या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

COMMENTS