Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घुसखोरी प्रकरणी एसआयटी चौकशी

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्‍वर मंदिरात शनिवारी 13 मे रोजी मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रवेशाचा प्रयत्न केला ह

राज्य सरकार विकत घेणार तोटयातील कारखाने
अखेर फडणवीसांची निर्दोष मुक्तता
मराठा आंदोलनातील खटले घेतले मागे

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्‍वर मंदिरात शनिवारी 13 मे रोजी मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रवेशाचा प्रयत्न केला होता. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
त्र्यंबकेश्‍वर मंदिर ट्रस्टच्या घटनेनुसार हिंदू धर्मीय सोडून अन्य धर्मियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. तसेच दर्शन घेण्याची परवानगी देखील नाही.  तरी देखील स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील मुस्लिम धर्मीय लोकांनी त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या उत्तर महाद्वारातून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेथे सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. मात्र या युवकांनी सुरक्षारक्षकांची हुज्जत घालून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. शनिवारी 13 मे रोजी रात्री 9:45 च्या सुमारास झालेला हा घुसखोरीचा प्रकार म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे. सबब या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट समितीने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात केली आहे. त्र्यंबकेश्‍वर मधील अखिल भारतीय कीर्तन कुल संस्थेने देखील याच आशयाचा अर्ज पोलीस स्टेशन मध्ये केला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची घटना घडली होती. स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील काही युवकांनी त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्रंबकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राह्मण महासंघ, किर्तन कुल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS