बंडखोरांना फूस कुणाची ?

Homeताज्या बातम्यादेश

बंडखोरांना फूस कुणाची ?

राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोन वेळेस बंडखोरीचा प्रयत्न झाल्यानंतर मोठया प्रमाणात हायहोल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. देवे

संपावर तोडगा काढण्यात अपयश का ?
ज्ञानाची, देवाची दारे उघडतांना …
राजकारणाचा उकिरडा

राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोन वेळेस बंडखोरीचा प्रयत्न झाल्यानंतर मोठया प्रमाणात हायहोल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी आणि त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड. यातून बंडखोरांना फूस कुणाची असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अजित पवारांनी माघार घेत पुन्हा राष्ट्रवादीत आल्यानंतर योग्य वेळ आल्यानंतर पहाटेच्या शपथविधीवर बोलेन असे बोलत वेळ मारुन नेली. मात्र अडीच वर्षांत अजित पवार याबद्दल बोलले नाही. तसाच प्रकार एकनाथ शिंदे यांचा देखील आहे. शिंदे खरंच 40-45 आमदार आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतात का. मग या बंडामागे फूस कुणाची आहे. कुणाच्या इशार्‍यावर शिंदे यांनी मोर्चेबांधणी केली. हा पक्ष अनुत्तरितच राहतो. आणि भविष्यात या प्रश्‍नांची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला मिळतील, याची अपेक्षा नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सत्तेची विभागणी तीन पक्षात झाली. त्यामुळे शिवसेनेच्या वाटयाला कमी मंत्रिपदे आली, कारण मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होते. मात्र मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेनेचे संघटन, विकासकामे वाढल्याचे दिसून येत नव्हते. मात्र आपले पंख छाटले असल्याची भावना आमदारांमध्ये बळावत चालली होती. त्यामुळे शिवसेनेमध्ये एक गट नाराज होता. मात्र खुद्द मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असल्यामुळे हा गट अनेक दिवसांपासून शांत होता. मात्र आता ही कमालीची शांतता बंडात कधी होईल, हा येणारा काळच ठरवणार होता. मात्र या बंडाच्या शिडात हवा कुणाची, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तब्बल चार दिवसांपासून सुरु असलेलं हे बंड आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. बंड केल्यानंतर शिवसेनेनं कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधीमंडळानं मान्यता दिल्याची माहिती समोर आल्यामुळे राज्यातील सत्तातंर नाटय कोर्टाच्या निर्णयप्रकियेत अडकण्याची चिन्हे आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीने भाजपसोबत जावे आणि सत्ता स्थापन करावी, असा अजितदादांची इच्छा होती. भाजप राष्ट्रीय पक्ष असून, केंद्रात त्यांची सत्ता आहे. त्यामुळे सारे काही जुळवून घेता येईल, असा त्यांचा होरा होता. मात्र विचारधारेचा मुद्दा करून, शरद पवारांनी अजित पवार यांची खेळी उलटवली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची खेळी पवार उलटवतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिंदे यांच्याकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे, आणि त्यांच्या पाठीशी भाजप असल्यामुळे पवारांना हा डाव उलटवणे शक्य होणार नाही. मात्र पवार हा डाव काही तास लांबवू शकतात, आणि तोच डाव ते खेळतांना दिसून येत आहे. पक्षातंरबंदी कायदा आणि विधानसभा उपाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर भाजपने आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केल्यास, सत्तांतरांचा प्रयोग हा काही तास लांबवू शकतो, या वेळेत पवार आणि शिवसेना त्या बंडखोर आमदारांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न करून, त्यांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न पवारांचा दिसून येत आहे. शरद पवारांच्या खेळीचा अंदाज येत नाही, असं त्यांच्याविषयी नेहमीच बोललं जातं. ते अत्यंत धूर्त, चाणाक्ष राजकारणी असल्याचंही मानलं जातं. मात्र, त्यांच्या काळातले राजकारणी तसेच होते. मग ते अहमद पटेल असो वा मुलायम सिंह यादव. या राजकारण्यांनी राजकारणातल्या बुद्धिबळात अनेक यशस्वी खेळी खेळल्या आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षांत पवारांच्या खेळींना मात देऊ शकतात, असे मुत्सद्दी राजकारणी भाजपमध्ये तयार झालेले आहेत. विशेषतः अमित शहा यांनी अनेक राज्यांतील डाव यशस्वी टाकले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीस देखील या सत्तांतर नाटयात सेफझोनमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

COMMENTS