Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच

अकोले : अकोले तालुक्यात कोतुळ येथे अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. या अवैध दारू आणि मटका याच्या आहारी अनेक तरुण गेले आहे, यामुळे पोलिसांच्या नाकावर

5 महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद, पोलिसांचा व्हाईट कॉलर सापळा यशस्वी
पिढ्यान्पिढ्या अतिक्रमित मौजे गंगापूरच्या गंगादेवी मंदीर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार ; ५ गंभीर, ४० जखमी

अकोले : अकोले तालुक्यात कोतुळ येथे अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. या अवैध दारू आणि मटका याच्या आहारी अनेक तरुण गेले आहे, यामुळे पोलिसांच्या नाकावर ठिच्चून सुरू असलेल्या मटक्या वर बंदी घालण्याची मोठी जबाबदारी अकोले पोलिसांवर येऊन ठेपली आहे.
अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, उपनिरीक्षक बाजीराव गवारी यांनी सापळा लावून गुरू वारी अवैध दारू ची वाहतूक करून दोघांनावर काकारवाई केली यात सहा लाखाचा ऐवज जप्त केला, मात्र सुमारे पंधरा दिवसापूर्वी मटका चालविणार्‍या कोतुळ येथील दोन ठिकाणावर पोलीस कारवाई झाली होती ,असे असूनही तो मटका व्यवसाय पुन्हा तेजीत सुरू आहे, यामुळे पोलिस कारवाया या केवळ फार्स ठरत्याय की काय असा अशीं चर्चा सुरू आहे शिेष बाब अशी कीगावात सुरु असलेला हा मटका व्यवसायाचे पूर्वेस कामगार तलाठी कार्यालय व त्याच्याच जवळ विद्यादान देणारे कोतुळेश्‍वर माध्यमिक विद्यालय, व बाजार तळ, अशा ठिकाणी चालत असून खेड्यापाड्यातून आलेले, आदिवासी तरुण या धंद्याकडे आकर्षीत होत आहे शाळेजवळच हा व्यवसाय खुले आम सुरू असल्याने उद्याची तरुण पिढी घडविणारे विद्यार्थी यात भरकटले जाण्याची भीती व्यक्त होत आहे,हा व्यवसाय करणारे फारच पारंगत असून नवीन ग्राहक आपल्याकडे आकर्षीत करण्यात तरबेज आहेत, तर वेळप्रसंगी कारवाईचा बडगा होण्याची चाहूल लागताच हे गायब होत असतात अस, मटका घेण्याच्या या गोरख धंद्यात एकूण 8 ते 9 जण कार्यरत असून, मटक्याची मोबाईलद्वारे देवाण घेवान होते अनेक ग्राहक फोन पे चा वापर करून मटका लावतात. साधारणपणे एका दिवसात दिड लाख रूपायापर्यंतची उलाढाल होत असल्याचे समजते. कल्याण, मिलन श्रीदेवी अशा वेगवेगळ्या 4 नावाने हा मटका दिवसभरात सात ते आठ वेळा जाहीर होत असल्याने एकाच व्यक्तीकडून सुमारे 2 हजार रुपयांपर्यंत आवक मटका व्यावसायीकांना होत असल्याने या धंद्यापासून बाजूला होण्यास मटका व्यावसायिक सहजासहजी तयार होत नाहीत,अनेक गरीब आदिवासी व शाळाबाह्य विद्यार्थी यात गुरफटलेले दिसत असून अनेकांचे सुखी प्रपंच यातून उध्वस्त होऊ पाहत आहेत,त्यामुळे यांना वेळीच आवर घालून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी कोतुळ येथील नागरिकांनी केली आहे, प्रसंगी अकोले तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याची तयारी कोतुळ येथील अनेक युवकांनी दाखवली आहे.

COMMENTS