Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

5 महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद, पोलिसांचा व्हाईट कॉलर सापळा यशस्वी

लातूर प्रतिनिधी - येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय खात्यातून 23 केाटीच्या अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपी मागील पाच महिन्यांपासून फरार होता.

जागृती शुगर कडून 200 रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा
गणेशोत्सवापूर्वी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उत्साहात मतदानास सुरवात 

लातूर प्रतिनिधी – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय खात्यातून 23 केाटीच्या अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपी मागील पाच महिन्यांपासून फरार होता. दोन चार दिवस झाले की ठिकाण आणि मोबाईलही बदलायचा. लातूरच्या आर्थिक गुन्हा शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी औरंगाबाद जिल्हा रूग्णालय परिसरात डॉक्टरांची वेशभूषा करून सापळा लावला. संशयित असलेल्या आरोपीस अरूण नावाने हाक मारली. त्यावर त्याने डॉक्टरसाहेब बोला ना… म्हणताच दबा धरून बसलेल्या इतर पोलिसांनी अरूण फुलबोयणे यास अटक केले.
अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी वेळोवळी सूचना केल्या. आरोपी अरूण फुलबोयणे हा औरंगाबाद याठिकाणी असल्याची गुप्त माहिती मिळताच लातूर येथील पोलिसांचे पथक रवाना झाले. त्यांनी रूग्णालय परिसरात अत्यंत सावधपणे सापळा लावला. याठिकाणी एक संशयित इसम वावरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी डॉक्टरांची वेशभूषा केलेल्या पोलिसाने त्यावर नजर ठेवली. संशयितास पोलिसाने अरूण नावाने हाक मारली. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता लागलीच डॉक्टरसाहेब बोला ना…अशी साद दिली. त्यावेळी डॉक्टरांच्या वेशातील व सापळा लावून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आम्ही पोलीस आहोत, असे डॉक्टरच्या वेशभूषेतील पोलिसांनी सांगताच आरोपी अरुण फुलबोलणे हा हवालदिल होऊन डॉक्टरांच्या वेशातील पोलिसाकडे पाहतच राहिला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, पोलीस अमलदार युवराज गाडे, बाळासाहेब ओवांडकर, संतोष पांचाळ ,अर्जुन कारलेवाड यांचा समावेश होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अरुण फुलबोयने राहत असलेल्या व वास्तव्य केलेल्या विविध ठिकाणांना अतिशय गोपनीय पद्धतीने भेटी देऊन त्या ठिकाणी गुप्तबातमीदार नेमण्यात आले होते. सदर बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करून नमूद आरोपीला अटक करण्याची योजना तयार करण्यात येत होती. अखेर 24 मे रोजी औरंगाबाद जिल्हा रूग्णालय परिसरातील सापळा लातूरच्या पथकाने यशस्वी केला.

COMMENTS