राम मंदिर ट्रस्टकडून जमीन खरेदी जादा दराने

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राम मंदिर ट्रस्टकडून जमीन खरेदी जादा दराने

अनेक वर्षे राम जन्मभूमीचा वाद चालल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब l DAINIK LOKMNTHAN
अटल सेतूवरून धावणार ‘शिवनेरी’ बस
शहर काँग्रेस राहणार…मनपा विरोधक ;मंत्री थोरातांनी दिले संकेत, शिवसेना-राष्ट्रवादीसमोर राहणार आव्हान

अयोध्या : अनेक वर्षे राम जन्मभूमीचा वाद चालल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला. हे राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातील अनेक भाविकांनी शक्य तेवढी मदत केली. हजारो-लाखो लोक दाते म्हणून पुढे आले. ’श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडून राम मंदिर उभारण्याचे काम सुरू असतानाच ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. अर्थात ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत. 

    आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार, ’श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपये किंमतीची जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. हा सरळ-सरळ ’मनी लॉन्ड्रिंग’चे प्रकरण असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. दोन कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेल्या जमिनीला पाच मिनिटे आणि पाच सेकंदाच्या कालावधीत 18.5 कोटी रुपयांना विकण्यात आले, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार पवन पांडेय यांनी केला. जमीन खरेदीचा सगळा खेळ महापौर आणि ट्रस्टी यांच्या संगनमताने झाला, असे त्यांनी म्हटले आहे.

    ’राम जन्मभूमीच्या जमिनीला लागून असलेली जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्च रोजी सायंकाळी सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन यांना दोन कोटी रुपयांना विकली. हीच जमीन अवघ्या काही मिनिटांत चंपत राय यांनी राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली,’ असा आरोप पांडेय यांनी केला आहे. आपले आरोप ठळ्ळक करण्यासाठी त्यांनी नोंदणी दस्तावेजही मीडियासमोर सादर केले आहेत. अवघ्या काही मिनिटांत दोन कोटी रुपयांच्या जमिनीची किंमत साडे अठरा कोटी कशी झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या नावावर भक्तांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिरासाठी कमीत कमी दराने जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित असून, राजकीय द्वेषातून आरोप करत आहेत. हे समाजाची दिशाभूल करण्यासाठी केले जात आहे, असे ते म्हणाले. देशभरातून लोक अयोध्येत जमीन खरेदीसाठी येऊ लागले. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले. ज्या प्लॉटची माध्यमांमध्ये चर्चा होत आहे, ती जागा रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेली मोक्याची जागा आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट मंदिरासाठी आतापर्यंत जी जमीन खरेदी केली, कमीत कमी किंमतीत खरेदी केली आहे, असे राय यांनी म्हटले आहे; मात्र त्यांनी अवघ्या काही मिनिटात जमिनीचा भाव नऊपट कसा वाढला, हे स्पष्ट केले नाही.

COMMENTS