Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांकडून पतीसह सासू, दिरावर गुन्हा दाखल

पुणे ः विवाहितेच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तसेच व्यवसायासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणत सासरच्या व्यक्तींनी मारहाण करुन विवाहितेचा मानस

सावकाराच्या जाचाला कंटाळून पुण्यात एकाची आत्महत्या
व्हाट्सअँप ला स्टेटस ठेवून शिक्षकाची आत्महत्या
आत्महत्याचे वाढते प्रमाण चिंताजनक

पुणे ः विवाहितेच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तसेच व्यवसायासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणत सासरच्या व्यक्तींनी मारहाण करुन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून 35 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
गौरी राजेंद्र खंडागळे (वय-35 रा. आंबोलीता, ता. खेड,पुणे ) असे आत्महत्या करणार्‍या विवाहिते महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती राजेंद्र बारकू खंडागळे, सासू कुसूम बारकू खंडागळे, दिर नितीन खंडागळे, रेखा नितीन खंडागळे, शोभा शिंदे (सर्व रा. आंबोलीता, ता. खेड, पुणे) यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार लोहगाव येथे घडला आहे. याप्रकरणी याबाबत मयत गौरी यांचे वडील विठ्ठल बंडू पवार (वय-65 रा. मु.पो. केळवडे ता. भोर, जि. पुणे) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गौरी खंडागळे आणि राजेंद्र खंडागळे यांचे 2013 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी आरोपींनी संगनमत करुन गौरीचा छळ करण्यास सुरुवात केली. व्यवसायासाठी तुझ्या आई वडिलांकडून पेसे घेऊन ये अशी मागणी आरोपींनी केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवागाळ करुन मारहाण केली. गौरीचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून गौरी हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम वारंगुळे करीत आहेत.

COMMENTS