Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारडा महाविद्यालयाच्या ९ छात्रांची अग्निवीर मधून भारतीय सैन्यात निवड

अहमदनगर प्रतिनिधी – पेमराज सारडा महाविद्यालयामधील अग्निवीर योजने अंतर्गत एनसीसीच्या ९ छात्रांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. आकाश मोहरे, भीम थो

पस्तीस लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह वेहिशोबी साठ किलो चांदी जप्त
कडक टाळेबंदी पाळणे सर्वांच्या हिताचे : नगराध्यक्ष वहाडणे
आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट

अहमदनगर प्रतिनिधी – पेमराज सारडा महाविद्यालयामधील अग्निवीर योजने अंतर्गत एनसीसीच्या ९ छात्रांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. आकाश मोहरे, भीम थोरात, तुकाराम तोडमल, ऋषीतेज काळे, श्रीमंत खोमणे, प्रज्योत सत्पुत्रे, तुषार पोटे, महेश कदम व संकेत शिंदे आदींची निवड झाली आहे. सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे(Dr. Rajendra Shinde) यांनी निवड झालेल्या सर्व छात्रांचे कौतुक करून सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.अंकुश आवरी, प्रा.कृष्णा पाटील, प्रा.नवनाथ बोंदे आदी उपस्थित होते.

            प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे म्हणाले, पेमराज सारडा विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्षण दिले जात आहे. त्यामुळे सर्व परिक्षांसह कला, क्रीडा, सांस्कृतिक व सर्व क्षेत्रात विद्यार्थी चमकत आहेत. महाविद्यालयाचा एनसीसी विभागही चांगले काम करत आहे. महाविद्यालयातील ९ छात्रांची अग्निवीर योजने अंतर्गत थेट सैन्य भारती झाल्याचा आनंद महाविद्यालयास झाला आहे. सर्व छात्रांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. कॅप्टन डॉ.अंकुश आवरी हे छात्रांना योग्य मार्गदर्शन करत आहे.

COMMENTS