Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

आरक्षणाचा अध्यादेश येईपर्यंत उपोषणावर ठाम

जालना/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या नेतृृृत्वाखाली मराठा आंदोलक उपोषण करत

मनोज जरांगेंनी आरक्षणाचा अभ्यास करावा
तीन शब्द वगळल्यानंतरच उपोषण सोेडणार
मनोज जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा

जालना/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या नेतृृृत्वाखाली मराठा आंदोलक उपोषण करत आहे. या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती मंगळवारी खालावली असून, राज्य सरकारच्या वतीने त्यांनी उपोषण मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे, मात्र जोपर्यंत आरक्षणाचा अध्यादेश सरकार काढत नाही, तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
काही वेळापूर्वीच अर्जुन खोतकर यांनी त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेश येईपर्यंत उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. एक दिवसात अध्यादेश आणला गेला तर तो कोर्टात टिकणार नाही असेही गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेंना समजावून सांगितले. मात्र त्यांनी उपोषण सोडण्यास आणि आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. या सगळ्यातून पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. सरकारच्या वतीने अर्जुन खोतकर यांनी माझ्याकडे निरोप घेऊन आले. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला कुणी आव्हान देऊ नये असं सरकारला वाटतं आहे. मी त्यांना त्यावर सांगितलं तीन महिन्यांचा वेळ समितीला देण्यात आला होता. मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती आहे. एक जीआर काढण्याचा प्रश्‍न आहे. पूर्वीपासून आमचा व्यवसाय शेती आहे कुणबी जात प्रमाणपत्र चॅलेंज करता येत नाही. आम्ही पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहोत. एक ओळीचा जीआर करायचा आहे की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. यासाठी काय आधार आहे ते मी सांगितले. सरकारला यात काही अडचण नाही. सरकारने जी.आर. काढावा यासाठी आम्ही आशावादी आहोत. चर्चा केली पाहिजे त्यातून मार्ग निघत नाही. चर्चा केली म्हणजे आंदोलन मागे घेणार असे नाही. आंदोलन जी.आर. आल्याशिवाय मागे घेणार नाही. असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची अधिकृत भूमिका माहित नाही. असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या या आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या 12 -15 वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हा अल्पभूधारक शेतकरी. मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणार्‍या जरांगे यांच्या मागे मोठे पाठबळ उभे राहील, अशी शक्यता आंतरवलीच्या आंदोनापूर्वी नव्हती. 2015 पासून गावागावात आंदोलन करण्यासाठी 12 पर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्या-त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते.

COMMENTS