पुण्यात निर्बंध शिथील ; सर्व व्यवहार होणार खुले ; व्यापार्‍यांच्या आक्रमकतेनंतर निर्बंधात शिथीलता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात निर्बंध शिथील ; सर्व व्यवहार होणार खुले ; व्यापार्‍यांच्या आक्रमकतेनंतर निर्बंधात शिथीलता

पुणे/प्रतिनिधी : राज्यातील 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथील केले आहेत. मात्र पुण्यासह 11 जिल्ह्यात निर्बंध शिथील केलेे नव्हते. आगामी दिवस सण-उत्सवां

शेतकर्‍यांना 25%  टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी-अनिल जगताप
बारवांना प्रशासन देणार कृतज्ञतेचा हात
मुंबईमध्ये निघाला विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा

पुणे/प्रतिनिधी : राज्यातील 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथील केले आहेत. मात्र पुण्यासह 11 जिल्ह्यात निर्बंध शिथील केलेे नव्हते. आगामी दिवस सण-उत्सवांचे असतांना, दुकाने रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवता येत नसल्यामुळे पुण्यातील व्यापार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रशासनासोबत बैठक घेत, पुण्यातील निर्बंध शिथील करण्याची घोषणा केली.
पुण्यातील सर्व दुकाने एक दिवस वगळता सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मॉल रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी 50 टक्केने सुरू राहतील. जलतरण सोडून सगळे गेम सुरू राहतील. त्याठिकाणी सोशल डिस्टंसीग पाळणे गरजेचे आहे. मॉल रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. दोन्ही लसी घेतलेल्यांनाच आत प्रवेश असेल. दर 15 दिवसात स्टाफचं मेडिकल तपासणी होईल. असेही त्यांनी सांगितले आहे. शाळांबाबतीत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॅबिनेट मिटिंग मध्ये चर्चा करू. राज्याच्या धार्मिक स्थळाविषयी जो निर्णय घेतला जाईल तोच पुण्याच्याबाबतीतही लागू असेल.
तर हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यातील सर्व उद्याने नियमित वेळेनुसार सुरु राहणार असून जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागणार असा इशारा पुणेकरांना दिला असून मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे अधोरेखित केले आहे. 13 तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा दर 5.5 आहे. पण तिथे लेव्हल 4 ऐवजी 3 ठेवली आहे. सात टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह दर गेला तर दिलेली मुभा थांबवली येईल. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंवडकरांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे. दुकानात विक्री करताना दुकानाचे मालक आणि सेल्समन मास्क वापरत नाही अशी तक्रार आहे. मुभा देत असताना करोना वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी. पुण्यातील प्रमाण 3.3 आणि पिंपरी चिंतवड 3.5 आणि ग्रामीणचे 5.5 आहे. ग्रामीणचा नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नियम न पाळल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील निर्बंधात सूट देत अजित पवारांनी दुकानाच्या वेळा वाढवण्याबरोबरच हॉटेल आणि अन्य आस्थापना यांनाही सूट दिली आहे. पण दोन्ही शहरातील नागरिकांनी नियम न पाळल्यास कडक पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे पुण्यातल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. ठरवलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजेच. तसेच मास्कचाही वापर करावा असेही ते म्हणाले आहेत. दुकानांच्या बाबतीत बोलताना पवार म्हणाले, दुकानांचे मालक, सेल्समन यांच्याबद्दल तक्रार येते की मास्क वापरत नाहीत. असे होता कामा नये. कुठलीही चूक होता कामा नये. सहा दिवस 8 पर्यंत दुकाने सुरू राहतील, मालक, सेल्समन यांनी दोन्ही लस घेतलेलेच असले पाहिजे.

COMMENTS