पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक निकाल आणि विजयाच्या जल्लो
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक निकाल आणि विजयाच्या जल्लोषात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या एका व्यक्तीची चक्क दोरीने बांधून रस्त्यावरून परेड काढल्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, निळ्या-सफेद कपड्यातील या व्यक्तीला लाल दोरीने बांधून ओढत नेले जात असल्याचे आणि कार्यकर्ते ‘जय श्री राम’च्या घोषणा देत लाथा मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हातात पक्षाचे ध्वज घेऊन कार्यकर्ते नाचताना आणि या अमानवीय देखाव्याचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. या घटनेवरून आता संतापाची लाट उसळली असून, विरोधकांनी यावर तीव्र टीका केली आहे. “एका महिला मुख्यमंत्र्यांच्या देखाव्याची अशा प्रकारे विटंबना करणे, हे महिला सक्षमीकरणाचे कोणते रूप आहे?” असा सवाल सोशल मीडिया युजर्स विचारत आहेत. काहींनी तर या क्रूर कृत्याची तुलना दहशतवादी संघटनांच्या वृत्तीशी केली आहे. दुसरीकडे, भाजप समर्थकांनी याला प्रतीकात्मक निषेध म्हणत ममता सरकारच्या काळातील हिंसाचाराचा दाखला दिला आहे. मात्र, या लाजिरवाण्या प्रकारामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून लोकशाहीच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

COMMENTS