Homeताज्या बातम्या

नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई; मटका-जुगार अड्ड्यांवर छापे, २१ जणांवर गुन्हे दाखल, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड: जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष म

पंकजाताईंच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या कला क्षेत्राला पाठबळ; डॉ. योगेश क्षीरसागरांकडून ‘नादवेध’ संगीत महोत्सवाचे आयोजन
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात व्यापक चळवळीची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर अधिवेशनात लक्षवेधी मांडावी; खासदार-आमदारांना डॉ. हंसराज वैद्य यांचे आवाहन

नांदेड: जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत तब्बल २१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दोन स्वतंत्र ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये एकूण ६,००,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिली कारवाई:

पहिली कारवाई हबीबिया कॉलनी, खुदबेनगर चौक येथे करण्यात आली. येथे कल्याण मटका आणि पत्त्यांवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १३ हजारांची रोख रक्कम, सुमारे ५९ हजार किमतीचे नऊ मोबाईल, मटका चिठ्ठ्या आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२०/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई:

दुसरी कारवाई बळीरामपूर येथील दिक्षानगर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली. येथे मोकळ्या जागेत ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपींकडून ४,२०० रुपये रोख, ७९ हजार किमतीचे पाच मोबाईल आणि ४.४५ लाख रुपये किमतीच्या होंडा शाईन, पॅशन प्रो व बुलेट अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ९१९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. जिल्ह्यातील अवैध मटका, जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध अशाच प्रकारची मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची गोपनीय माहिती पोलिसांना देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS