Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांना 25%अग्रीम पिक विमा न दिल्यास पिक विमा कार्यालय फोडणार-श्रीराम बादाडे

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात 21 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने खंड दिल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 25% अग्रीम पीकविमा मिळण्यासंदर्भात तात्काळ

पुण्यात कोयता गँगची काढली धिंड
दोन जुळ्या बहिणींचे एकच शरीर
विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात 21 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने खंड दिल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 25% अग्रीम पीकविमा मिळण्यासंदर्भात तात्काळ अधिसूचना काढावी तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा.नसता मनसेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा तसेच शेतकर्‍यांना 15 दिवसात25% अग्रीम पिक विमा न दिल्यास बीड येथील पिक विमा कार्यालय फोडणार असा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना काल दि.21 ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी दिला आहे.
 बीड जिल्ह्यात 21दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने खंड दिला आहे, त्यामुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत 25% अग्रीम भरपाईची तरतूद आहे. या ट्रिगर अंतर्गत 21 दिवस पावसात खंड पडला, दुष्काळ पडला,पूर आधी संकटांमुळे नुकसान झाल्यास ही भरपाई लागू पडते. यावर्षी जून मध्ये पाऊस नसल्याने जुलैमध्ये पेरण्या झाल्या व जुलैमध्ये ही दोनच आठवडेच पाऊस पडला आहे तर 20 ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे, 19 ऑगस्ट पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे व थोडीफार भूरभूर ही आहे. परंतु हा भुरभूरीचा पाऊस 2.4 मिमी पेक्षा कमी असल्याने बीड जिल्हा 25% अग्रीम नुकसानीसाठी पात्र होतो. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी तालुका पिकविमा समितीकडून तात्काळ सर्वेक्षण अहवाल घेऊन कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाईसाठी अधिसूचना काढावी,कारण या पावसाच्या खंडाने जिल्ह्यातील सर्वच मंडळातील 5 लाख 83 हजार 286 हेक्टर वरील खरीप पिके धोक्यात आली आहेत.त्यामुळे  या बाबीचा आपण गांभीर्याने विचार करून बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विमाधारक शेतकर्‍यांना 25% अग्रीम नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना आपण तात्काळ काढावी व ही अधिसूचना काढूनही त्याचे पालन  पिकविमा कंपनी करत नसेल तर विमा कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल  तसेच शेतकर्‍यांना 15 दिवसात 25 % अग्रीम पिक विमा न दिल्यास बीड येथील पिक विमा कार्यालय फोडणार  असा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे , उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बीडवे, सहकार सेना जिल्हाध्यक्ष अशोक सुरवसे, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके, उपशहरध्यक्ष आकाश टाकळकर, शहर सचिव कार्तीक जव्हरी, अनिल उर्फ बंडु जमदाडे उपस्थित होते.

COMMENTS