Homeताज्या बातम्या

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या आमदार आशुतोष काळे यांच्या सूचना कोपरगाव : कोपरगाव सनियंत्रण सल्लागार समितीची बैठक नुकतीच आमदार आशु

ओगदी-करंजी रस्त्याची दुरावस्थाप्रशासनाचा  हलगर्जीपणा; नागरिक हैराण
ओव्हरलोडिंग वाहनांवर होणार कडक कारवाई; परिवहन विभागाच्या हालचाली, आमदार आशुतोष काळेंच्या सूचनांची दखल
आमदार आशुतोष काळे यांचा व्यापारी संघाकडून नागरी सत्कार

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या आमदार आशुतोष काळे यांच्या सूचना

कोपरगाव : कोपरगाव सनियंत्रण सल्लागार समितीची बैठक नुकतीच आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सोयी-सुविधा तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार काळे यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना दिल्या.

रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, आवश्यक औषधसाठा व वैद्यकीय सुविधा २४ तास उपलब्ध असाव्यात, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील स्वच्छता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती यावर भर देत, सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य सेवांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी समितीच्या सदस्यांसमवेत २८.८४ कोटी रुपये निधीतून सुरू असलेल्या १०० बेडच्या नवीन उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामासाठी अधिकच्या निधीची गरज भासल्यास शासन स्तरावरून तो मिळवून दिला जाईल, असे सांगत लवकरच हे सुसज्ज रुग्णालय कोपरगाव परिसरातील नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदीप दळवी, आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गुट्टे, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. उंबरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. अजय गर्जे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता वर्षराज शिंदे यांच्यासह वैभव कानडे, हारुन शेख, मयुरेश शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS