सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे यांनी सोपवली उपनेतेपदाची जबाबदारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्या आणि आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट ;कौटुंबिक वाद चव्हाट्यावर | LOKNews24
बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी देवेंद्र लांबे
गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम आरती सिंग करत ; रवी राणांचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्या आणि आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली.
यावेळी बोलतांना अंधारे म्हणाल्या की, शिवसेनेत प्रवेश करुन मला काय मिळणार, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. काय द्याचे आणि काय घ्यायचे हा मुद्दा नसून मला शिवसेनेकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही. सद्यस्थितीत माझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे, मी शिवसेनेला काय देऊ शकते. सैरभैर झालेल्या शिवसैनिकात एक नवीन उमेद जागविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुषमा अंधारे म्हणाल्या, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथे संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशावेळी भाजपविरोधात निकरानं झुंज देणार्‍या उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही धर्मनिरपेक्षतावादी लोकांनी असले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटत आहे, म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ज्याक्षणी उद्धव ठाकरे यांनी जेव्हा म्हटले होते की, माझे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही, त्याक्षणी चांद्यापासून बांद्यापर्यंत जोडला गेलेले कार्यकर्ते माझ्यासोबत शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असेही यावेळी अंधारे यांनी सांगितले. माझ्या डोक्यावर ईडीचे ओझे नाही, मी आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून जो लौकिक मिळाला आहे. त्यानुसार मी काम करत राहिन. आज जोरजोरात रडायचं आणि उद्या दुसर्‍या गटात सामिल व्हायचं हे माझ्याकडून होणार नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगले अशा अर्थानं मी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करत आहे, असेही अंधारे यावेळी म्हणाल्या.

COMMENTS