Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार  

संभाजी भिडेचे पुन्हा बेताल वक्तव्य ; राज्यभरात संताप

अमरावती : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे याने पुन्हा एकद

राज्यातून दररोज 70 मुली बेपत्ता
आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निमगाव वाघातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
भारतीय क्रिकेटची ब्राह्मणी परिक्रमा!

अमरावती : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे याने पुन्हा एकदा महात्मा गांधींवर खालच्या पातळीवरची टीका करत, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्तव्य अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलतांना भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लिम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला. देशामध्ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणार्‍या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदार्‍या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढार्‍यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्हणाले. कार्यक्रमापूर्वी भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळाजवळ भिडे यांच्या विरोधात आंदोलन केले. काही ठिकाणचे पोस्टरही फाडण्यात आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

महात्मा गांधींच्या आईला पळवून आणल्याचा दावा – संभाजी भिडे म्हणाले, महात्मा गांधींच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नसून ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहे. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधीजींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील आहे, असा दावाही संभाजी भिडे यांनी केला.

भिडेला अटक करा ः पृथ्वीराज चव्हाण – महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळात उमटले. यावरून विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

समाजात तेढ निर्माण करणार्‍या व्यक्तीला कलम 153 अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम 153 अंतर्गत या व्यक्तीला अटक केली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी. तर, याची नोंदी घेतली आहे. चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS